एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगरमध्ये CRPFच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा सीआरपीएफच्या कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे.
श्रीनगर : श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पला दोन दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला लष्करी तळावरील हल्ला ताजा असताना आज (सोमवार) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. श्रीनगरच्या करण नगर इथं ही घटना घडली आहे.
LIVE : दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद
आज पहाटे 4.30 वाजता अंधाराचा फायदा घेत एके-47 असलेल्या दोन दहशतवाद्यांनी या कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण कायम सतर्क असणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
त्यामुळे या दहशतवाद्यांनी जवळच्याच इमारतीत घुसून तिथून गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या संपूर्ण इमारतीलाच घेराव घातला. दरम्यान, गेल्या सात ते आठ तासापासून दोन्ही बाजूने सतत गोळीबार सुरु आहे. या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी जवानांनचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. गेल्या दोन दिवसात लष्करावर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 10 फेब्रुवारीला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-पठाणकोट हायवेवरील सुंजावाँ लष्करी तळावर हल्ला केला होता. ज्यामध्ये पाच भारतीय जवान शहीद झाले होते. तर यावेळी चार दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आलं होतं. दरम्यान, लष्करी तळावर हल्ला करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही दहशतवाद्यांनी आपल्या जवानांनवर हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांनी आतापर्यंत कोण-कोणत्या लष्करी तळावर हल्ले केले? 18 सप्टेंबर 2016 : उरीमधील लष्करी तळाव दहशतवाद्यांचा हल्ला, भारतीय लष्कराचे 19 जवान शहीद 29 नोव्हेंबर 2016 : जम्मू-काश्मीरच्या नगरोटामधील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 7 जवान शहीद, दोन दहशतवादी ठार 27 एप्रिल 2017 : कुपवाडाच्या पंजगाममध्ये लष्करी तळावर हल्ला, 3 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार 5 जून 2017 : बांदीपुराच्या सुंबलमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर दहशतावादी हल्ला, यामध्ये लष्कराने चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. 27 ऑगस्ट 2017 : पुलवामाच्या पोलीस लाईनवर दहशतवादी हल्ला, आठ जवान शहीद, तीन दहशतवादी ठार संबंधित बातम्या : दहशतवादी हल्ल्यातील जखमी महिलेची यशस्वी प्रसुती जम्मूतील सुंजवाँ कॅम्प ऑपरेशन संपलं, पाच जवान शहीदJammu & Kashmir: Gunshots heard near CRPF camp in Srinagar's Karan Nagar; More details awaited.
— ANI (@ANI) February 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement