एक्स्प्लोर
Advertisement
गावाचा विकास पाहून फार समाधान वाटलं: सचिन
नेल्लोर (आंध्रप्रदेश): राज्यसभा खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दत्तक घेतलेलं आंध्रप्रदेशातील गाव पुट्टमराजु कांडरिकाची प्रगती पाहून चांगलाच खुश झाला.
हे गाव आंध्रप्रदेशमधील नल्लोर जिल्हात आहे. दोन वर्षापूर्वी दत्तक घेतलेल्या गावाचा सचिननं नुकताच दौरा केला. येथील विकास कामाचं सचिनच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
या विकास कार्यासाठी एकूण 2.79 कोटी खर्च करण्यात आले. यावेळी बोलताना सचिन म्हणाला की, 'गावात झालेली ही प्रगती पाहून मी फार समधानी आहे.' यावेळी सचिननं गावातील तरुणांना क्रिकेट साहित्याचं वाटपही केलं. तसेच गावातील अनेक कुटुंबाशी चर्चाही केली. तसेच स्वच्छ भारतला सफल करण्यासाठी तुमच्या एकजुटीची गरज असल्याचंही गावकऱ्यांना सांगितलं. गावात एक स्टेडियम बनवण्यासाठी आपण आवश्यक ती मदत करु असंही सचिननं आश्वासन दिलं आहे. सचिननं खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हे गाव दत्तक घेतलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2014 साली या गावाचा दौरा केला होता.Proud to state our adopted village Puttamraju Kandriga is open defecation free #SwachhBharat The phase 1 work of SAGY is complete! @PMOIndiapic.twitter.com/zAXK8ernUK
— sachin tendulkar (@sachin_rt) November 16, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement