एक्स्प्लोर
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!
मुंबई: मुंबई ते गोवा धावणारी ‘तेजस’ आजपासून (सोमवार) मुंबईतून सुटणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुंबईतून तेजसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
मुंबई ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या अलिशान तेजस एक्स्प्रेसची सफारी अनुभवण्यासाठी प्रवासी उत्सुक असतानाच, काल काही समाजकंटकांनी तेजस एक्स्प्रेसच्या काचा फोडल्याचं निदर्शनास आलं. रेल्वे फॅक्टरीतून तेजस एक्स्प्रेस दिल्ली रेल्वे स्टेशनवर दाखल झाली, तेव्हा तिच्या काही काचा फुटल्याचं आढळून आलं.
कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस अगदी आरामदायक आणि जलद असून यामुळे कोकणवासियांचा वेळ वाचवणार आहे.
केवळ साडे आठ तासात मुंबई ते गोवा हा पल्ला गाठता येणार आहे. तेजस ट्रेन ताशी 200 किमी प्रतितास वेगाने धावणार असून, देशातील ही पहिली ट्रेन असेल. तसेच याच्या निर्मितीसाठी रेल्वेने तब्बल 3 कोटी 25 लाख रुपये खर्च केले आहेत.
दरम्यान, कवीवर्य केशवसुतांच्या तुतारी या कवितेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने त्या नावाने नामांतर झालेली राज्यराणी एक्सप्रेस आजपासून ‘तुतारी’ या नावाने धावणार आहे.
‘तेजस’चा सुपरफास्ट प्रवास
पावसाळी वेळापत्रक सोमवार, बुधवार, शनिवार सीएसटी – पहाटे 5.00 वाजता करमाळी – दुपारी 3.40 वाजता परतीचा प्रवास मंगळवार, गुरुवार, रविवार करमाळी – दुपारी 2.30 वाजता सीएसटी – रात्री 11 वाजता पावसाळा वगळता बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सीएसटी – पहाटे 5 वाजता करमाळी – दुपारी 1.30 वाजता परतीचा प्रवास करमाळी – दुपारी 2.30 वाजता सीएसटी – रात्री 11 वाजता तेजसचे थांबे सीएसटी, दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी संबंधित बातम्या: मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement