एक्स्प्लोर
3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, तुमची दरमहा बचत किती?
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. नोटाबंदीनंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातील महत्वाची गोष्ट म्हणजे टॅक्समध्ये कपात करण्यात आली आहे.
अर्थमंत्री जेटली यांनी मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात काहीसा दिलासा दिला. कारण टॅक्स स्लॅबमध्ये बदल न करता, टॅक्स रेटमध्ये बदल करण्यात आला आहे.
3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी यापूर्वी असलेला 10 टक्के टॅक्स आता 5 टक्क्यांवर आणला आहे. इतकंच नाही तर 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) दिल्यामुळे आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही. कलम 87A अंतर्गत 50 हजारांची (रिबेट) ही सवलत देण्यात आली आहे.
तीन लाखापर्यंत उत्पन्नधारकांना कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. पण जर तुमचं उत्पन्न 3 लाखाहून अधिक आणि साडेतीन लाखापेक्षा कमी असेल तर त्यासाठी 2575 रुपये टॅक्स द्यावा लागेल.
3 ते 5 लाखापर्यंच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
3 ते 5 लाख या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के कर लागेल. म्हणजेच 3 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. मात्र उरलेल्या 2 लाखांवर तुम्हाला 10 हजार टॅक्स आणि सेस भरावा लागेल.
(रुपयांमध्ये) | आधी | आता | बचत | दरमहिना बचत |
तीन लाखांपर्यंत | 00 | 00 | 00 | 00 |
3.5 लाखांपर्यंत | 5,150 | 2,575 | 2,575 | 215 |
4 लाखांपर्यंत | 10,300 | 7,725 | 2,575 | 215 |
4.5 लाखांपर्यंत | 15,450 | 10,300 | 5,150 | 429 |
5 लाखांपर्यंत | 20,600 | 12,875 | 7,725 | 644 |
abpmajha.abplive.in | ||||
10 लाखांपर्यंत | 1,28,750 | 1,15,875 | 12,875 | 1073 |
15 लाखांपर्यंत | 2,83,250 | 2,70,375 | 12,875 | 1073 |
20 लाखांपर्यंत | 4,37,750 | 4,24,875 | 12,875 | 1073 |
abpmajha.abplive.in | ||||
25 लाखांपर्यंत | 5,92,250 | 579,375 | 12,875 | 1073 |
50 लाखांपर्यंत | 13,64,750 | 13,51,875 | 12,875 | 1073 |
1 कोटीपर्यंत | 29,09,750 | 31,86,563 | -2,76,813 (नुकसान) | -23,068 (नुकसान) |
संबंधित बातम्या :
मध्यमवर्गीयांना दिलासा, सर्व बजेट एकत्र
बजेटमधील तुमच्या फायद्याच्या 10 महत्वाच्या गोष्टी
अर्थसंकल्पामुळे काय महाग, काय स्वस्त?
3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 3 ते 5 लाखाच्या टप्प्यात 50% कपात
ई-तिकीटासाठी सेवाकर नाही, रेल्वे बजेटमध्ये घोषणा
ऐतिहासिक शब्दाची व्याख्या स्पष्ट करणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री
नोटाबंदी गेल्या बजेटमध्ये का जाहीर केली नाही? : उद्धव ठाकरे
हा ‘शेर ओ शायरी’चा अर्थसंकल्प : राहुल गांधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement