एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 3 ते 5 लाखाच्या टप्प्यात 50% कपात
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. नोटाबंदीनंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पातील महत्वाची गोष्ट म्हणजे टॅक्समध्ये कपात करण्यात आली आहे.
अर्थमंत्री जेटली यांनी मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात काहीसा दिलासा दिला. कारण टॅक्स स्लॅबमध्ये बदल न करता, टॅक्स रेटमध्ये बदल करण्यात आला आहे.
3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
म्हणजे, आता 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी यापूर्वी असलेला 10 टक्के टॅक्स आता 5 टक्क्यांवर आणला आहे. इतकंच नाही तर 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) दिल्यामुळे आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही. कलम 87A अंतर्गत 50 हजारांची (रिबेट) ही सवलत देण्यात आली आहे.
तीन लाखापर्यंत उत्पन्नधारकांना कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. पण जर तुमचं उत्पन्न 3 लाखाहून अधिक आणि साडेतीन लाखापेक्षा कमी असेल तर त्यासाठी 2500 रुपये टॅक्स द्यावा लागेल.
तर 80 सी कलमानुसार दीड लाख गुंतवणूक केल्यास 4.5 लाख उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स शून्य असणार आहे.
3 ते 5 लाखापर्यंच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
3 ते 5 लाख या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के कर लागेल. म्हणजेच 3 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. मात्र उरलेल्या 2 लाखांवर तुम्हाला 10 हजार टॅक्स आणि सेस भरावा लागेल.
5 लाखांवरील उत्पन्नधारकांनाही सवलत
5 लाखांवरील उत्पन्नधारकांना करात वार्षिक 12 हजार 500 रुपये सवलत असेल.
50 ते 1 कोटी उत्पन्नधारकांना 10 टक्के अधिक सरचार्ज
50 लाख ते 1 कोटी उत्पन्नधारकांना टॅक्स असेलच शिवाय 10 टक्के अधिक सरचार्जही असणार आहे. तसेच 1 कोटीपेक्षा अधिक उत्पन्नावर 15 टक्के सरचार्ज असणार आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे:
#अर्थबजेटचा गेल्या वर्षात परदेशी गुंतवणूक वाढली: अरुण जेटली
#अर्थबजेटचा उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक: अरुण जेटली
'चांगल्या उद्दिष्टांचा कधीच पराभव होत नाही' अरुण जेटलींचा भाषणात महात्मा गांधींच्या वचनाचा नोटाबंदीबाबत उल्लेख
#अर्थबजेटचा करचुकवेगिरीमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान: अरुण जेटली
#अर्थबजेटचा करचुकवेगिरीमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान: अरुण जेटली
#अर्थबजेटचा देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न: अरुण जेटली
#अर्थबजेटचा रेल्वेचं बजेट बंद झालं असलं तरीही त्यांची स्वायत्तता कायम राहणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा शेतकऱ्यांना 10 लाख कोटींचं कृषीकर्ज उपलब्ध करुन देऊ: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 5 वर्षात सरकारचं उत्पन्न दुप्पट व्हावं हा सरकारचा संकल्प: अरुण जेटली
#अर्थबजेटचा पीकविम्यासाठी 9 हजार कोटी उपलब्ध करुन देऊ: अरुण जेटली
#अर्थबजेटचा यंदा कृषी विकासदर 4.1 टक्के इतका राहण्याचा अंदाज: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 3 लाख कोटी रुपये ग्रामविकासासाठी खर्च करणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य: अरुण जेटली
#अर्थबजेटचा ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे: अरुण जेटली
#अर्थबजेटचा तीन वर्षात 20 हजार कोटी नाबार्डला देणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 2018 पर्यंत प्रत्येक गावापर्यंत वीज पोहचलेली असेल: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 2019 पर्यंत 1 कोटी लोकांना पक्कं घर दिलं जाणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 60 टक्के गावांमध्ये शौचालय उभारण्यात आली: अरुण जेटली
#अर्थबजेटचा दूध प्रक्रिया उद्योगांसाठी 8 हजार कोटींची तरतूद: अरुण जेटली
#अर्थबजेटचा रेल्वे सुरक्षेसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 3500 किलोमीटरपर्यंतचे लोहमार्ग तयार करणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 2 लाख 41 हजार 346 कोटींची तरतूद: अरुण जेटली
#अर्थबजेटचा गावं इटरनेटनं समुद्ध करण्यासाठी 'डिजिगाव' योजना: अरुण जेटली
#अर्थबजेटचा पीपीपी मॉडेलद्वारे छोट्या शहरांमध्ये विमानतळं उभारणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 1 कोटी 25 लाख लोकांनी भीम अॅपचा वापर केला: अरुण जेटली
#अर्थबजेटचा ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ स्मार्ट कार्ड देणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 2017-18 या आर्थिक वर्षात 21 लाख 47 हजार कोटी रुपये खर्च करणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा संरक्षण विभागासाठी 2 लाख 74 हजार कोटींची तरतूद: अरुण जेटली
#अर्थबजेटचा देशातून पलायन करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी नवा कायदा तयार करणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 52 लाख लोकांनी 5 ते 10 लाख उत्पन्न दाखवलं: अरुण जेटली
#अर्थबजेटचा नयी दुनिया है, नया है रंग, काले धन को भी बदलने पडा अपना रंग: : अरुण जेटली
#अर्थबजेटचा जमीन अधिग्रहणाच्या मोबदला रक्कमेस कर लागणार नाही: अरुण जेटली
#अर्थबजेटचा छोट्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात कपात करणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा राजकीय पक्षांना फक्त 2000 रुपयांपर्यंतची देणगी रोखीनं स्वीकारता येणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा 2.5 ते 5 लाख उत्पन्नावरील करात 50 टक्के कपात, 5 टक्केच कर आकारला जाणार: अरुण जेटली
#अर्थबजेटचा तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही : अरुण जेटली
#अर्थबजेटचा 3 ते 5 लाख उत्पन्न- 5 % टॅक्स, 5 लाखांवरील उत्पन्नधारकांना- करात 12,500 सवलत: अरुण जेटली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
Advertisement