(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kili Paul Honoured : टांझानियाचा इन्स्टा स्टार किली पॉलचा भारताकडून सन्मान, बॉलिवूडच्या गाण्यांवर अनेक रिल्स व्हायरल
टांजानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलला टांजानियातील भारतीय दुतावासाने सन्मानित केले आहे.
Trending News : सध्या टांजानियाचा (tanzania) किली पॉल (kili paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे कारण असे आहे की, किली हा बॉलिवूडच्या प्रेमात पडलाय. तो हिंदी गाण्यांवरील रिल्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्याच्या रिल्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळत आहे. टांजानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलला टांजानियातील भारतीय दुतावासाने सन्मानित केले आहे. सोशल मीडियावर किली पॉलचे आता लाखो फॅन आहेत. एवढे फॅन तर एखाद्या बॉलीवूड कलाकाराला देखील नाही.
टांजानियाच्या भारतीय उच्चायुक्ताने बिनाया प्रधान यांनी सोमवारी ट्विटरवर पॉल सोबतचा एक फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. फोटोमध्ये बिनाया प्रधानला भारतीय दूतावासात पॉलला सन्मानित करताना दिसत आहे. प्रधान यांनी ट्विट केले आहे की, आज टंजानियाच्या भारतीय दूतावासात एक खास पाहुणा आला आहे. हिंदी गाण्यांवरील रिल्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत लाखो भारतीयांचे मन जिंकले आहे.
Today had a special visitor at the @IndiainTanzania ; famous Tanzanian artist Kili Paul has won millions of hearts in India for his videos lip-syncing to popular Indian film songs #IndiaTanzania pic.twitter.com/CuTdvqcpsb
— Binaya Pradhan (@binaysrikant76) February 21, 2022
पॉलने इन्स्टाग्रामवर भारतीय उच्चायुक्तांचे आभार म्हणाले आहे. त्याने लिहिले आहे की, भारतीय उच्चायुक्तांचे आभार मानले आहे. कल हो ना हो' या चित्रपटाच्या टायटल साँगवर लिप्सींग करतानाच्या किलीच्या व्हिडीओला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 93 हजारपेक्षा जास्त लाइक्स किलीच्या या व्हिडीओला मिळाले असून 9 लाख 31 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सध्या पॉलचे सोशल मीडियावर 22 लाख फॉलोअर्स आहे. अभिनेता आयुष्मान खुराना, गुल पनाग आणि ऋचा चड्डा सहित अनेक भारतीय कलाकार पॉलला सोशल मीडियावर फॉलो करत आहे.
किलीसोबतच त्याची बहिण निमा पॉल देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असते. या दोघांच्या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.