एक्स्प्लोर
सुषमा स्वराज यांच्यावर आठवड्याअखेर किडनी प्रत्यारोपण?

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आठवड्याच्या अखेरपर्यंत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. नात्यातील नसलेल्या जिवंत दात्याकडून सुषमा यांना किडनी ट्रान्सप्लांट केली जाणार आहे. एम्स रुग्णालयात येत्या विकेंडला स्वराज यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याचे संकेत आहेत. नात्यात नसलेला अवयवदाता म्हणजे कोणीही असू शकतं. एखादा मित्र, शेजारी, दूरचा नातेवाईक. स्वराज यांच्या कुटुंबातच अनुरुप किडनीदाता न सापडल्यामुळे नात्यात नसलेल्या अवयवदात्याकडून किडनी प्रत्यारोपण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात येत आहे. संबंधित समितीकडून किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी देण्यात आली आहे. चालू आठवड्याच्या अखेरीस शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन सध्या करण्यात आलं आहे. सुषमा आणि अवयवदात्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून दोघंही फिट असल्याचा अहवाल आहे. एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येईल. सुषमा यांना दीर्घकाळापासून मधुमेह असल्यामुळे त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आलं होतं. आठवड्यातून तीनवेळा त्यांचं डायलिसीस करण्यात येतं. देशभरातून अनेक दात्यांनी सुषमा यांना किडनी देण्याची तयारी दाखवली होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्वत: स्वराज यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. “किडनी निकामी झाल्याने मी एम्स रुग्णालयात आहे. सध्या मी डायलिसीसवर आहे. किडनी प्रत्यारोपणसंदर्भातील चाचण्या माझ्यावर उपचार सुरु आहेत. भगवान कृष्णाची कृपा राहू दे” असं ट्विट सुषमा स्वराज यांनी 16 नोव्हेंबरला केलं होतं. सुषमा स्वराज यांनी महिन्याभरापूर्वी संयुक्त राष्ट्रात खणखणीत भाषण दिलं होतं. प्रकृती ठीक नसतानाही त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेला उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला होता. मात्र महासभेहून परतल्यानंतरही मूत्रपिंडाचा त्रास जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
सुषमा स्वराज यांची किडनी निकामी, दिल्लीत उपचार सुरु
सुषमा स्वराजना किडनीदान करण्यासाठी यवतमाळच्या दात्याचं पत्र
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























