एक्स्प्लोर
Advertisement
बंगळुरुत सरावादरम्यान दोन सूर्यकिरण विमानांची हवेत धडक, एका वैमानिकाचा मृत्यू
वर्षातून दोनदा होणाऱ्या 'एअरो इंडिया 2019' या कायक्रमाचं आयोजन 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2019 दरम्यान बंगळुरु होत आहे. या एअर शोची प्रॅक्टिस याठाकाणी सुरु होती. मात्र दोन्ही विमानामध्ये धडक झाली आणि दुर्घटना घडली.
बंगळुरु : भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण टीममधील दोन हॉक विमानांमध्ये हवेतच धडक झाली. धडकेनंतर दोन्ही विमानं जमिनीवर कोसळली आणि जळून खाक झाली. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला असून दोन वैमानिक सुरक्षित आहेत.
बंगळुरुतील येलाहांका एअरबेसवरुन झेपावल्यानंतरच हा अपघात झाला. उद्या बंगळुरुत वायुसेनेच्या सूर्यकिरण टीमचा एअर शो होणार आहे. वर्षातून दोनदा होणाऱ्या 'एअरो इंडिया 2019' या कायक्रमाचं आयोजन 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2019 दरम्यान बंगळुरु होत आहे. या एअर शोची प्रॅक्टिस या ठिकाणी सुरु होती. मात्र दोन्ही विमानामध्ये धडक होऊन दुर्घटना घडली.
या विमानात एकूण तीन वैमानिक होते. वैमानिकांनी पॅराशूटच्या साहाय्याने विमानातू उडी मारली. परंतु दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका वैमानिकाचा मृत्यू झाला. तर इतर दोन वैमानिक सुरक्षित आहे. मात्र त्यांना कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
'सूर्यकिरण'ची वैशिष्ट्ये
- 27 मे, 1996 मध्ये सूर्यकिरण टीमची स्थापना झाली होती.00
- सूर्य किरण टीममध्ये सहभागी झालेले विमान एअर शो सादर करतात.
- एका टीममध्ये 9 विमानांचा समावेश असतो.
-सूर्य किरणने आजवर श्रीलंकापासून सिंगापूरपर्यं जवळपास 400 शो केले आहेत.
- 2011 साली सूर्यकिरण विमानाला एअर शोमधून हटवण्यात आलं होतं.
- 2015 साली पुन्हा एकदा सूर्यकिरणला एअर शोमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement