एक्स्प्लोर
Advertisement
सर्व्हे : लग्नाबाबत भारतीय तरुणाईची पसंती काय?
मुंबई : लग्नसराईचा मोसम आहे. अनेकांची कर्तव्य पार पडत आहेत. पण भारतीय तरुणाई लग्नाबाबत काय विचार करतं, याचा खुलासा एका सर्वेक्षणात झाला आहे.
लग्नामुळे आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थैर्य येईल, असं बहुतांश तरुणाईला वाटतं. www.shadi.com या वेबसाईटने नुकताच अविवाहित तरुण-तरुणींचे लग्नाबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे केला. या ऑनलाईन सर्वेक्षणात 25 ते 32 वर्षांदरम्यानच्या 14,700 जणांनी सहभाग घेतला होता. यात 47 टक्के तरुणी आणि 53 टक्के तरुणांचा सहभाग होता.
सुमारे 20.5 टक्के तरुण आणि 23.1 टक्के तरुणींनी सांगितलं की, "ते लग्नासाठी आणखी वाट पाहू शकत नाहीत." तर 12.2 टक्के तरुण आणि 10.3 टक्के तरुण म्हणाले की, "आमचा जन्म लग्नासाठी झालेला नाही आणि आम्हाला लग्नात रस नाही." याशिवाय 18.2 टक्के तरुण आणि 13.2 टक्के तरुणी द्विधा मनस्थितीत आहेत. लग्न करण्याबाबत त्यांचा ठोस निर्णय झालेला नाही.
लग्नासाठी आमचा जन्म झालेला नाही, असं बोलणाऱ्या तरुण आणि तरुणींना याचं कारण विचारलं. यावर 35.1 टक्के तरुण आणि 27.2 टक्के मुलींनी सांगितलं की, "त्यांना जबाबदारी स्वीकारायची नाही." तर "आमचा लग्नावर विश्वास नाही," असं 23.2 टक्के मुलं आणि 21.3 टक्के मुलींनी सांगितलं.
जवळपास 26.3 टक्के मुलं आणि 20.3 तरुणी म्हणतात की, "दीर्घ काळासाठी संसारात अडकून राहायचं नाही." तर "लग्नानंतर आयुष्यात होणाऱ्या बदलाची भीती वाटते," असं 15.4 टक्के पुरुष आणि 31.2 टक्के महिलांनी सांगितलं.
लग्नानंतरचा सर्वात मोठा फायदा काय?, असं विचारलं असता 25.7 टक्के पुरुष आणि 34.7 टक्के महिलांनी त्याचं उत्तर भावनात्मक आधार हे दिलं. आयुष्यभराचा साथीदार मिळणं हा लग्नाचा सर्वात मोठा फायदा असल्याचं 33.7 टक्के पुरुष आणि 45.2 टक्के महिलांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement