एक्स्प्लोर
बाबरी मशीद प्रकरणावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब
नवी दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि इतर भाजप नेत्यांविरोधात खटला चालवावा का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता होती.
विशेष म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर नेत्यांची बाबरी मशीद प्रकरणातील आरोपांमधून मुक्तता केली होती. मात्र, मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या नेत्यांना आरोपांमधून मुक्त करण्यास असहमतीचे संकेत दिले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर भाजप नेत्यांना रायबरेली कोर्टाने बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी आरोपी केले होते.
"लालकृष्ण अडवाणी आणि इतर नेत्यांना तांत्रिक मुद्द्यांवर आरोपमुक्त करणं योग्य नाही. आम्ही तुम्हाला (सीबीआय) 13 जणांविरोधात कट रचल्याच्या आरोपासह पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी देतो. शिवाय, संयुक्तपणे खटला चालवण्यासही कनिष्ठ न्यायालयाला सूचना देतो.", असे सुप्रीम कोर्टाने सीबीआयला सांगितले.
बाबरी मशीद प्रकरणातील मुख्य खटला कारसेवकांविरोधात लखनौ ट्रायल कोर्टात प्रलंबित आहे, तर अडवाणींसह इतर भाजप नेत्यांवरील खटला रायबरेलीमध्ये आहे. दोन्ही खटले संयुक्तपणे चालवण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे.
संबंधित बातमी : राम मंदिर खटला संवेदनशील, सहमतीने सोडवा : सुप्रीम कोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement