एक्स्प्लोर
Advertisement
“एकवेळ राज्यांना सीईटीची परवानगी देऊ, मात्र खासगी संस्थांना नाही”
नवी दिल्ली : नीटसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही, मात्र शासकीय कॉलेजातल्या प्रवेशासाठी सीईटीला परवानगी देण्यास सुप्रीम कोर्ट सकृतदर्शनी तयार असल्याचं दिसलंय.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानं आज कोर्टात राज्यांच्या सीईटीना शासकीय कॉलेजातल्या प्रवेशासाठी नीटमधून सवलत देण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलं.
सुनावणी संपवताना कोर्टानंही केंद्राचं मत असेल, तर राज्यांना आम्ही नीटमधून वगळू, मात्र खासगी कॉलेजेस, संस्थांना कुठल्याही परिस्थितीत ही सवलत देणार नाही असं म्हटलंय.
सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?
केंद्र सरकारची बाजू ऐकल्यानंतर सोमवारी यासंदर्भातला अंतिम निर्णय होईल. राज्य आणि केंद्र सरकारची या प्रश्नावर एकत्र बैठक घेण्याचं नियोजित आहे. सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी त्यासाठी कोर्टाकडे दोन दिवसांचा वेळ मागितलाय. सोमवारी 9 मे ला दुपारी दोन वाजता यासंदर्भातला अंतिम निर्णय होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे सीईटीतून शासकीय वैद्यकीय कॉलेजात प्रवेश आणि इतर खासगी कॉलेजातल्या प्रवेशासाठी मात्र नीट असं चित्र तयार होऊ शकते. ज्यांना 1 मे ला नीटची परीक्षा देता आली नाही, त्यांनाच 24 जुलैची परीक्षा देण्याची संधी मिळावी असं एमसीआयनं म्हटलंय. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून नेमका काय प्रस्ताव येतो, आणि कोर्ट त्यावर सोमवारी काय निकाल देणार याकडे सगळ्या मेडिकल जगताचं लक्ष लागलेलं असेल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement