एक्स्प्लोर

अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली: अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रुपये वाढ झाली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर (एलपीजी) 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दरम्यान, याबरोबरच विमान इंधन (एटीएफ)च्या दरामध्ये देखील जवळजवळ पाच टक्के कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. याआधी एक मार्च आणि एक फेब्रुवारीला विमान इंधनात वाढ करण्यात आली होती. मात्र, आता पाच टक्के घट करण्यात आल्यानं विमान प्रवास स्वस्त होणार आहे. * या बरोबरच विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 14.50 रुपयांची कपात केली असल्यानं आता 737.50 रुपयांऐवजी 723 रुपये मोजावे लागणार आहेत. * तर अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 5.57 रुपयांची वाढ केल्यानं आता त्यासाठी 440.05 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 मार्च 2017ला विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 86 रुपयांनी महागला होता: विनाअनुदानित गॅस सिलेंडरची दरवाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ ठरली होती. याआधी 1 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरचे दर 66.50 रुपयांनी वधारले होते. विनाअनुदानित 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरचे दर त्याआधी 650.50 रुपये होते. तर सप्टेंबर 2016 मध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 466.50 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या दरात सहा वेळा वाढ करण्यात आली आहे. सप्टेंबर 2016 नंतर आतापर्यंत एलपीजी सिलेंडर 58% म्हणजेच 271 रुपयांनी महागला होता. मात्र आता विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 14.50 रुपयांची घटे केल्यानं ग्राहकांना काहिसा दिलासा मिळणार आहे. याआधी तेल कंपन्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही 13 पैशांची किरकोळ वाढ केली होती. याआधी 1 फेब्रुवारीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 9 पैशांची वाढ करण्यात आली होती. दोन किरकोळ वाढीच्या आधी अनुदानित गॅस सिलेंडरचे दर 8 वेळा वाढले असून, प्रत्येक वेळी किमान 2 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र आता थेट 5.57 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे दरही 214 रुपये प्रति किलोलिटर वाढवले होते, त्याचा दर 54,293.38 रुपये झाला होता. यापूर्वी 1 फेब्रुवारी विमान इंधनाच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ केली होती. मात्र, आता थेट 5 टक्क्यांनी यामध्ये कपात करण्यात आली आहे. संबंधित बातम्या:   विनाअनुदानित सिलेंडर महागला, नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू नववर्षात गॅसचा भडका, विनाअनुदानित सिलेंडर महाग

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget