एक्स्प्लोर
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तीन नवे नियम लागू
बचत खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या खातेधारकांना लागणारा दंड 75 टक्क्यांनी कमी होणार आहे.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी तीन नवे नियम लागू करणार आहे. या बदलांमुळे एसबीआयच्या 25 कोटी खातेधारकांवर परिणाम होणार आहे. बचत खातं अर्थात सेव्हिंग्ज अकाऊण्टहोल्डर्सना एसबीआयने मोठा दिलासा दिला आहे. मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या खातेधारकांना लागणारा दंड 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. एसबीआयमध्ये समाविष्ट केलेल्या बँकांचे चेकबुक आजपासून ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामध्ये बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, भारतीय महिला बँक या बँकांचा समावेश आहे. 31 मार्चपूर्वी नवीन चेकबुक इश्यू करण्याबाबत एसबीआयने वारंवार सूचना दिल्या होत्या. स्टेट बँकेच्या 11 शाखांमध्ये इलेक्टोरल बॉन्ड उपलब्ध होणार आहेत. एसबीआयला या सीरिजच्या विक्रीचे अधिकृत हक्क देण्यात आले आहेत. स्टेट बँकेत 2 ते 10 एप्रिल या कालावधीत निवडणूक करारपत्र मिळणार आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
राजकारण






















