(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmedabad Municipal Corporation: अहमदाबादमध्ये 'या' ठिकाणी अंडी आणि मांसाहार विकण्यास बंदी, महापालिकेचा निर्णय
Ahmedabad Municipal Corporation: यापूर्वी, राजकोट महानगरपालिकेनं उघड्यावर मांसाहार किंवा अंडी विक्रीवर बंदी घातली होती.
Ahmedabad Municipal Corporation: गुजरातमधील अहमदाबादमध्ये धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक रस्त्यावर अंडी आणि मांसाहार पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आलीय. अहमदाबाद महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. अहमदाबाद शहरात शाळा, कॉलेज, कम्युनिटी हॉल आणि मंदिराच्या परिसरात अंडी आणि मांसाहार विकता येणार नाही. अहमदाबादमध्ये 16 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यापूर्वी गुजरातमधील भावनगर, जुनागढ, राजकोट आणि बडोदा महानगरपालिकेनं धार्मिक स्थळांजवळ आणि सार्वजनिक रस्त्यांवर मांसाहार आणि अंड्याची दुकानं न लावण्याचा आदेश दिलाय.
अहमदाबाद महानगरपालिकेच्या नगर नियोजन समितीचे अध्यक्ष देवांग दाणी म्हणाले की, "शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटरच्या आत आणि सार्वजनिक रस्त्यांवर मांसाहारी वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नाही. हा निर्णय उद्यापासून लागू होईल."
अहमदाबाद महापालिकेच्या महसूल समितीचे अध्यक्ष जैन वकील यांनी शनिवारी महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीला पत्र लिहून रस्त्यावर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली. अलिकडच्या काळात सार्वजनिक ठिकाणी अंडी आणि मांसाहार पदार्थांच्या विक्रीमुळं नागरिकांना रस्त्यावरून जाताना अनेक समस्या होतात. दरम्यान, रहिवाशांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जातायेत. आपल्या संस्कृतीचं पालन करण्यासाठी हे निर्बंध लागू करणं गरजेचं आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलंय.
यापूर्वी, राजकोट महानगरपालिकेनं उघड्यावर मांसाहार किंवा अंडी विक्रीवर बंदी घातली होती. तर वडोदरा महानगरपालिकेनं देखील उघड्यावर मांसाहारी पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली होती. उघड्यावर मांसाहार विक्री करणाऱ्यांबरोबरच त्याचं सेवन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं दोन्ही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-