पुस्तकातील लेखन भोवले; काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला, जाळपोळ
Salman Khurshid house vandalized : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला करून जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Salman Khurshid : काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला करण्यात आला. खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. हल्ला करण्यास आलेल्या जमावाच्या हातात भाजपचा झेंडा होता. या हल्ल्यानंतर खुर्शीद यांनी आपण काही चुकीचे म्हटंल होतं का, असा सवाल केला आहे. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी राकेश कपिलसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सलमान खुर्शीद यांनी आपले पुस्तक ‘‘सनराइज ओवर अयोध्या: नेशनहुड इन आवर टाइम्स’’या पुस्तकात कथितपणे हिंदुत्वाची तुलना बोको हराम, आयसिससोबत केली होती. त्यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात टीका केली होती.
कांग्रेस नेता सलमान खुर्शीद के नैनीताल के घर पर आगजनी, पत्थरबाजी
— जैनेन्द्र कुमार (@jainendrakumar) November 15, 2021
उपद्रवियों के हाथ में बीजेपी का झंडा था और वे साम्प्रदायिक नारे लगा रहे थे. अपनी किताब में हिंदुत्व की तुलना आतंकी आईएसआईएस और बोको हरम जैसे संगठनों से करने के बाद से खुर्शीद हिंदुत्ववादी संगठनों के निशाने पर हैं. pic.twitter.com/wkaqvn69ze
सलमान खुर्शीद यांनी या वादावर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, ही मंडळी धर्माला विकृत करण्यामध्ये एकसारखे आहेत. हिंदूत्वाने सनातन धर्म आणि हिंदू धर्मातील मूल्यांसोबत फारकत घेतली असून बोको हराम आणि अशाच दुसऱ्या संघटनांप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा लोकांचे हिंदू धर्माशी काहीही घेणेदेणे नाही. अशा लोकांच्या हिंदुत्वामुळे धर्म विकृत होत असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले होते.
भाजपने मागील आठवड्यात काँग्रेस नेत्यांवर आरोप करताना हिंदूत्वाबाबत त्यांच्या मनात घृणित भावना असल्याचे म्हटले होते. गांधी कुटुंबीयांकडून याला पाठबळ मिळत असल्याचा आरोप भाजपने केला होता. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व भिन्न असल्याचे म्हटले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारसरणी देशासाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
संबंधित वृत्त:
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha