Sonam Wangchuk: वांगचुक यांची 'Save Ladakh' मोहीम, उपोषणाचा पाचवा दिवस, देशभरात सामाजिक कार्यकर्त्यांकडून एक दिवसीय उपोषण
Sonam Wangchuk Climate Fast : सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या लडाखमधील (Ladakh) आंदोलनाचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे.
Sonam Wangchuk Climate Fast : सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या लडाखमधील (Ladakh) आंदोलनाचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. बॉलिवूडच्या चित्रपट 'थ्री इडियट्स'मधील रँचो पात्र वांगचुक यांच्यापासूनच प्रेरित आहे. वांगचुक लडाख (Ladakh) वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरू असून तेथील वातावरण अत्यंत थंड आहे. गोठवणाऱ्या थंडीतही लडाखच्या विविध प्रश्नांसाठी सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच लडाखच्या संरक्षणासंदर्भात अनेक मुद्द्यांसाठी वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे.
देशभरातील जनतेला आवाहन
सोनम वांगचुक यांनी आज उपोषणाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण देशातील पर्यावरण प्रेमींना एका दिवसाचं उपोषण करण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही तुमच्या शहरातून देशाच्या कोणत्याही भागातून एका दिवसासाठी उपोषण करुन पर्यावरण वाचवण्यासाठीच्या या मोहिमेमध्ये सामील होऊ शकता, असं वांगचुक यांनी सांगितलं आहे. तसेच, सोशल मीडियाद्वारे तुमच्या उपोषणाची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.
सोनम वांगचुक यांची सोशल मीडिया पोस्ट
हिमाचलच्या सामाजिक कार्यकर्त्यांचं उपोषण
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची धग देशभरात पोहोचली आहे. वांगचुक यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये 30 जानेवारी रोजी सर्व लोकांना त्यांच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत हे आवाहन केलं आहे. यानंतर त्यांच्या समर्थनार्थ हिमाचलचे सामाजिक कार्यकर्ते 30 जानेवारीला शिमलामध्ये एक दिवसीय उपोषण करत आहेत.
बर्फवृष्टी सुरू असतानाही वांगचुक यांचं उपोषण सुरुच
हाडं गोठवणाऱ्या थंडीत सोनम वांगचुक उपोषण करत आहे. लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावरुन गेल्या चार दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. लडाखच्या थंड हवामानात सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. बर्फवृष्टी सुरू असतानाही वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरुच ठेवलं आहे.
लडाखच्या लेफ्टनंट गव्हर्नरवर गंभीर आरोप
वांगचुक यांनी आरोप केलाय की, लडाख प्रशासन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, ते लडाखमधील पर्यावरणविरोधी विकास प्रकल्पांच्या विरोधात उपोषण करत आहेत. सोनम वांगचुक यांनी लडाखच्या लेफ्टनंट गव्हर्नरवर गंभीर आरोप केले आहे. लडाखमध्ये फक्त लेफ्टनंट गव्हर्नरची मनमानी सुरू असल्याचा आरोप वांगचुक यांनी केला आहे. लडाखमध्ये तीन वर्षांपासून कोणतेही काम झालेलं नाही, असंही वांगचुक यांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
थ्री इडियट चित्रपटातील रिअल रँचो सोनम वांगचुक यांचं 'बायकॉट मेड इन चायना'चं आवाहन