(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सासऱ्याच्या संपत्तीमध्ये जावयाचा कोणताही अधिकार नाही, केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय
सासऱ्याच्या संपत्तीमध्ये आणि घरामध्ये जावयाचा अधिकार नसल्याचा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे
मुंबई : केरळ उच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की, जावयाला त्याच्या सासऱ्याच्या मालमत्तेत आणि इमारतीमध्ये कोणताही कायदेशीर अधिकार असू शकत नाही. जरी त्याने इमारतीच्या बांधकामासाठी काही रक्कम खर्च केली असेल तरी देखील त्याचा अधिकार राहणार नाही. न्यायमूर्ती एन अनिल कुमार यांनी तालिपारंबा, कन्नूर येथील डेव्हिस राफेल यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेलं अपील फेटाळत हा निर्णय दिला आहे. सासरे हेंड्री थॉमस यांच्या मालमत्तेवरील डेव्हिस राफेल यांचा दावा कोर्टाने फेटाळून लावला.
न्यायमूर्ती एन. अनिल कुमार यांनी दंड लावत दुसऱ्या अपीलला तहकूब केले. आणि सांगितले की, मुलीशी विवाह केल्यानंतर जावई हा त्या परिवाराचा हिस्सा मानले जाते. याचा अर्थ असा होत नाही की जावयाचा सासऱ्याचा संपत्तीवर अधिकार आहे. जरी जावई त्या घरामध्ये राहत असला त्याने घर बांधण्यासाठी पैसे दिले असतील तरी जावयाचा त्या घरावर किंवा सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क नाही.
भारतामध्ये जावयाला अधिक मान दिला जातो. परदेशात जावयाला तेवढा मान दिला जात नाही. पण भारतात अशा अनेक घटना घडलेल्या आहे की, श्रीमंत मुलींशी विवाह करून घरजावई होतात. त्यानंतर सासऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगतात. वेगवेगळ्या माध्यमाताून संपत्ती हडपण्याच्या घटना भारतात घडलेल्या आहे. न्यायालयात असे अनेक वाद प्रलंबित आहे की, घरजावयाने आपल्या पत्नीची संपत्तीवर हक्क सांगून सासऱ्याची संपत्तीवर हडपण्याच्या तक्रारी आहे. बरेच असे प्रकार आहे की, असे वाद परस्पर संमतीने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. पण ते पूर्णपणे मिटत नाही. घरजावयाने संपत्तीवर सांगितलेल्या दाव्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे जावई हा घरातील सदस्य असला तरी घर जावई असणे हे लज्जास्पद असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.
संबंधित बातम्या :