Indigo : इंडिगोकडून वैमानिकांच्या वेतनात कपात, आंदोलन करणाऱ्या वैमानिकांचे निलंबन
इंडिगो (IndiGo) एअरलाइन्सच्या उद्याच्या आंदोलनाची योजना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंडिगोकडून काही वैमानिकांना निलंबित करण्यात आले आहे.
![Indigo : इंडिगोकडून वैमानिकांच्या वेतनात कपात, आंदोलन करणाऱ्या वैमानिकांचे निलंबन Some pilots suspended from Indigo in the wake of tomorrow Indigo worker agitation Indigo : इंडिगोकडून वैमानिकांच्या वेतनात कपात, आंदोलन करणाऱ्या वैमानिकांचे निलंबन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/17/e5a0bda1a1d1d1e381668ee8aaac7c62_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : इंडिगोकडून (IndiGo) वैमानिकांच्या वेतनात कपात करण्याच्या निर्णयानंतर काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मंगळवारी होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने काही वैमानिकांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मूठभर इंडिगो वैमानिकांनी नोकरीच्या अटींचे आणि कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबन केल्याची माहिती इंडिगोने ‘एबीपी माझा’ला दिली आहे.
कोरोना काळादरम्यान घेतलेल्या पगार कपातीचा निर्णय मागे घेण्यास अजूनही विलंब होत असल्याच्या निषेधार्थ वैमानिकांकडून उद्या संपाचे आयोजन करण्यात आला आहे. गेल्या महिन्यांपर्यंत सुमारे 28 टक्के वेतन कपातीच्या निषेधार्थ वैमानिक मंगळवारी सामूहिक रजेवर जाण्याचा विचार करत होते. परंतु त्याअगोदरच काही वैमानिकांना निलंबित करण्यात आले.
एप्रिल महिन्यापासून वैमानिकांच्या वेतनात 8 टक्के वेतन कपात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. या निर्णयामुळे वैमानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि कर्मचारी संपाची योजना करत होते. गेल्या आठवड्यात, काही वैमानिकांनी पगार कपातीच्या निषेधार्थ 5 एप्रिल रोजी आजारी असल्याची तक्रार नोंदवण्याची मागणी केली होती. तसेच इंडिगो कर्मचार्यांची युनियन बनवण्याबाबत चर्चा केली होती, त्यानंतर एअरलाइन्समधील कर्मचार्यांची “ग्रॅंड युनियन” असं नाव देण्यात आलं होतं डीजीसीएकडून ह्या वादासंदर्भात कोणतीही भूमिका घेणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. इंडिगो कर्मचाऱ्यांकडून उद्याच्या मास्क सीक लिव्हबद्दल सध्या स्पष्टता नाही, इंडिगोचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या :
प्रवासादरम्यान सामानाची अदलाबदल झाली, स्वतःची बॅग शोधण्यासाठी पठ्ठ्याने ‘इंडिगो’ची वेबसाईटच हॅक केली!
Crude Oil Price Hike : घर रंगवणं महागणार! कच्च्या तेलाच्या महागाईमुळे पेंट निर्मात्यांना झटका, इंडिगो पेंट्सचे शेअर 11 टक्क्यांनी घसरले
Indigo Update: राकेश गंगवाल यांचा इंडिगो संचालक पदाचा राजीनामा; सह-संस्थापक राहुल भाटियाशी झालेल्या वादानंतर घेतला निर्णय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)