एक्स्प्लोर

Crude Oil Price Hike : घर रंगवणं महागणार! कच्च्या तेलाच्या महागाईमुळे पेंट निर्मात्यांना झटका, इंडिगो पेंट्सचे शेअर 11 टक्क्यांनी घसरले

Share Market Update : कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर, पेंट निर्मात्या कंपन्यांना पेंट्सच्या किंमती वाढवाव्या लागणार आहेत. परिणामी घरं रंगवणे महाग होणार आहे.

Paints Stocks : कच्च्या तेलाच्या किमती ( Crude Oil Price Hike) वाढल्याचा फटका संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy)  सहन करावा लागू शकतो. मात्र शेअर बाजारात  (Indian Stock Market) कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेंट्स कंपन्यांच्या  (Paints Companies) शेअर्सना सर्वाधिक फटका बसत आहे. कारण महागड्या कच्च्या तेलाच्या दरवाढीचा मोठा फटका कलर बनवणाऱ्या कंपन्यांना सोसावा लागणार आहे. महाग कच्च्या तेलामुळे त्यांची किंमत वाढेल, ज्यामुळे पेंट्स कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की कच्च्या तेल हा पेंट्स बनवणार्‍या कंपन्यांसाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा माल आहे.

पेंट्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
सोमवारी, इंडिगो पेट्सचा (Indigo Paints) स्टॉक 11 टक्क्यांनी घसरून 1,498 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला. इंडिगो पेट्सचा स्टॉक सध्या 1536 रुपयांवर आहे. पेंट्स क्षेत्रातील मोठी कंपनी एशियन पेंट्सच्या (Asian Paints) स्टॉकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. एशियन पेंट्सचा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरून 2601 रुपयांवर आला, तर सध्या 2.92 टक्क्यांच्या घसरणीसह तो 2658 रुपयांवर व्यवहार करत आहे.

एशियन पेंट्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3590 रुपये आहे. नेरोलॅक पेंट्स (Kansai Nerolac Paints) चा शेअर देखील 5 टक्क्यांनी घसरला आणि तो 423 रुपयांवर गेला. बर्जन पेंट्स (Berger Paints) चा शेअर 2.79 टक्क्यांनी घसरून 634 रुपयांवर व्यवहार करत आहे. शालिमार पेंट्स (Shalimar Paints), अकझो नोबेल इंडियाच्या (Akso Nobel India) शेअर्समध्येही घसरण झाली आहे.

पेंट्सच्या किमती वाढण्याची शक्यता
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर, पेंट निर्मात्या कंपन्याना त्यांच्या पेंट्सच्या किंमती वाढवाव्या लागण्याची शक्यता आहे. पेंट्स किंमत वाढल्यास साहजिकच त्याचा परिणाम मागणीवर दिसून येतो. त्यामुळे घर रंगवणे सामान्यांसाठी महाग होऊ शकते. यामुळेच स्टॉक एक्स्चेंजमध्ये पेंट्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.

टीप : येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून पैसे गुंतवण्यापूर्वी नेहमी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या. एबीपी न्यूज पैसे गुंतवण्याबाबत कोणताही सल्ला देत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget