स्मार्टफोन-आधारित COVID-19 चाचणी, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात रिझल्ट
हे तंत्र अल्पावधीत जास्तीत जास्त लोकांची चाचणी घेण्यास मदत करेल, जेणेकरुन कोरोना रूग्णांची ओळख पटवून त्यांना विलग करण्यास मदत होणार आहे. यामुळे इतर लोक संक्रमणापासून वाचतील.
![स्मार्टफोन-आधारित COVID-19 चाचणी, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात रिझल्ट smartphone-based COVID-19 test gives results in less than 30 minutes स्मार्टफोन-आधारित COVID-19 चाचणी, 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात रिझल्ट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/08023807/Covid-test.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीशी झगडत आहे. अशातचं शास्त्रज्ञांनी एक असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या मदतीने 30 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत कोविड -19 च्या तपासणीचा रिझल्ट समजतो. हे तंत्र सीआरआयएसपीआर वर आधारित आहे. येणाऱ्या काळात हे खूप फायदेशीर ठरू शकते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
'सेल' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, नवीन चाचणीद्वारे केवळ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह समजणार नाही तर व्हायरल लोडची (विषाणू संसर्गाचे केंद्र) देखील तपासणी होणार आहे. सर्व सीआरआयएसपीआर तपासणीत व्हायरल आरएनए डीएनएमध्ये रूपांतरित होणे आवश्यक आहे. ते शोधण्यापूर्वी त्याचं अॅनालिसीस करणं आवश्यक असतं. ही पद्धत जास्त गुंतागुंतीची असून वेळखाऊ आहे.
याउलट, सीआरआयएसपीआरचा वापर करुन व्हायरल आरएनएचा थेट शोध लागतो. अमेरिकेतील ग्लेडस्टोन इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ संशोधक जेनिफर डोडना म्हणाले, की “सीआरआयएसपीआर-आधारित तपासणीबद्दल आम्ही उत्सुक आहोत कारण ती आवश्यक असताना त्वरित व अचूक निकाल देते.”
डाउडना म्हणाले, की ज्या ठिकाणी तपाणीवर मर्यादा आहेत किंवा कमी वेळात जास्त तपासणीची आवश्यकता असेल, अशा ठिकाणी ही पद्धत खूफ फायदेशीर आहे. हे कोविड -19 संबंधीत अनेक अडथळ्यांवर मात करू शकते. "डाउडना यांना सीआरआयएसपीआर-सीएएस जीनोम संपादनाच्या तपासणीसाठी 2020 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. संशोधकांना असे आढळले की डिव्हाइसला पाच मिनिटांच्या आता पॉझिटिव्ह नमुने अचूकपणे सापडले.
COVID-19 vaccines | कोरोना लसीच्या घोषणेसाठी मोदी सरकारने मुहूर्त ठरवला?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)