एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फिल्म फेस्टिव्हलमध्ये राष्ट्रगीताचा अपमान, सहा तरुण ताब्यात
तिरुवनंतपूरम : राष्ट्रगीताचा अपमान केल्याच्या आरोपात केरळमध्ये सहा तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. थिएटरमध्ये राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
महत्त्वाचं म्हणजे चित्रपट सुरु होण्यासाठी थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी देशभरातील चित्रपटगृहांना दिला आहे.
रणवीर सिंहला पाहून देशभक्ती कशी जागी होईल? : ट्विंकल खन्ना
केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (आयएफएफके) ही घटना घडली. कन्नाकाकुन्नू निशागंधी ओपन एअर थिएटरमध्ये आयएफएफकेच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होतं. पण हे तरुण उभे राहिले नाहीत. समारंभात उपस्थित पोलिसांनीही त्या तरुणांना उभं राहण्यास सांगितलं, पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. एवढंच नाही तर आयएफएफकेच्या आयोजक आणि चलचित्र अकादमीचे संचालक चार्मिन कमाल यांनीही त्या सहा तरुणांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं. पण तरीही त्यांनी नकार दिला. यानंतर पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं.चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावा : सर्वोच्च न्यायालय
या सहा तरुणांना म्युझियम पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. फिल्म फेस्टिव्हलदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान करतील, त्यांच्यावर नजर ठेवण्याचा आदेश पोलिस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी दिला आहे. तर फेस्टिवल आयोजित करणाऱ्या केरला चलचित्र अकादमीकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement