एक्स्प्लोर

Sidhu Moose Case : शार्प शूटर महाकाल उलगडणार मुसेवालांच्या हत्येचं रहस्य? पंजाब पोलिसांकडून चौकशी

Interrogation With Mahakal : पुणे पोलिसांनी सौरभ महाकाल नावाच्या गुन्हेगाराला अटक केली असून, त्याचाही संबंध सिद्धू मूसवाला खून प्रकरणाशी असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.

Interrogation With Mahakal : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Moose Wala Murder Case) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आलं आहे. पुण्यातील आरोपी सौरव महाकाल (Saurabh Mahakal) याला अटक करण्यात आली आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक (Pune Police) गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. 

दोन दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी (Punjab Police) सिद्धू मुसेवाला प्रकरणातील काही शार्प शुटर्सच्या नावांचा खुलासा केला होता. त्यामध्ये महाकालचंही नाव होतं. पुण्यात दाखल झालेल्या मक्का प्रकरणात सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करण्यात आली आहे. पण मुसेवाला हत्या प्रकरणी पंजाब पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, सौरभ महाकाल हा संतोष यादव गँगचा सदस्य आहे. संतोष यादववर (Santosh Yadav Gang) यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

महाकालचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशीही संबंध असून त्याच्यावर राजस्थानमध्येही काही गुन्हे दाखल आहेत. लॉरेन्स बिश्नोई 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत असून आता पंजाब पोलीस त्याचीही चौकशी करणार आहेत. 

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाच्या तपासात पंजाब पोलिसांव्यतिरिक्त दिल्ली पोलिसही चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या तपासात आतापर्यंत जे समोर आलं त्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई हा मुसेवाला हत्याकांडाचा मास्टर माईंड आहे. लॉरेन्सच्या निकटवर्तीय सचिन बिश्नोईचा या प्रकरणाशी थेट संबंध नसून, सचिन बिश्नोईनं या हत्या प्रकरणात समन्वयाचं काम केलं आहे.

सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या 

पंजाबमधील आप सरकारनं काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता. 

लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली हत्येची जबाबदारी

मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.

सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हत्या

पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget