एक्स्प्लोर
राजस्थानच्या पोटनिवडणुकीवरुन शिवसेनेचा भाजपवर निशाणा
‘गुजरात निवडणुकीत ट्रेलर दाखवला होता. तर राजस्थानची निवडणूक केवळ इंटरव्हल आहे, २०१९ मध्ये पिक्चर पूर्ण होईल.’
मुंबई : भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर आता शिवसेनेनं भाजपची फिरकी घेतली आहे. ‘गुजरात निवडणुकीत ट्रेलर दाखवला होता. तर राजस्थानची निवडणूक केवळ इंटरव्हल आहे, २०१९ मध्ये पिक्चर पूर्ण होईल.’ असा चिमटा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढला आहे.
‘२०१९ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा बाण सुटला की तो परत येत नसतो’, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसनं बाजी मारली.
राजस्थान पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, तिन्ही जागा काँग्रेसला
राजस्थानमधील अलवर आणि अजमेर या लोकसभेच्या दोन जागा, तर मांडलगढ या विधानसभेच्या जागेसाठी 29 जानेवारीला पोटनिवडणूक झाली होती. अजमेरमधील भाजप खासदार सांवरलाल जाट, अलवरचे भाजप खासदार चांद नाथ आणि मांडलगढमधील भाजप आमदार कीर्ति कुमारी यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती.
काँग्रेसने पोटनिवडणुकीत तिन्ही जागा भाजपच्या गोटातून खेचून आणल्या. अलवरमध्ये काँग्रेसच्या करण सिंह यादव यांनी भाजपच्या जसवंत सिंह यांचा 1 लाख 56 हजार 319 मतांनी पराभव केला. मांडलगढ विधानसभेच्या जागेवर काँग्रेसच्या विवेक धाधड यांनी भाजप उमेदवार शक्ति सिंह हांडा यांच्यावर 12 हजार 976 मतांनी मात केली. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement