एक्स्प्लोर

सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करुन सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. या ट्वीटला अभिनेत्री रेणुका शहाणेने रिट्वीट करत तुमच्या आयटी सेलला शांत राहण्याचं आवाहन केलं.

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलने सुरु आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना शांततेंचं आवाहन केलं. मोदींच्या या ट्वीटला अभिनेत्री  रेणुका शहाणेने रिट्वीट केलं आणि भाजपच्या आयटी सेलला शांत राहण्याचं आणि अफवा न पसरवण्याचं आवाहन करा, असं मोदींना सांगितलं.

रेणुका शहाणेने रिट्वीट करताना म्हटलं की, "सर, तुम्ही कृपया तुमच्या (भाजप) सर्व आयटी सेटला ट्विटर हँडलपासून दूर राहण्याचं आवाहन करा. जास्तीत जास्त अफवा त्यांच्याकडून पसरवल्या जात आहेत. त्यांची जास्तीत जास्त माहिती खोटी आणि भ्रम पसरवणारी असते. ती देशातील शांती, एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा." रेणुका शहाणेचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसह हजारो युजर्सनी रेणुका शहाणेचं ट्वीट रिट्वीट केलं आहे.

जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "देशात शांतता टिकवून ठेवण्याची वेळ आहे. देशात एकता आणि बंधूभाव टिकवायला हवा. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी या हिंसक आंदोलनांपासून दूर राहावे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी, सशक्त लोकशाही टिकवण्यासाठी, उपेक्षित आणि गरिबांच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे."

अभिनेता राजकुमार रावने ही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांविरुद्धच्या पोलीस कारवाईचा निषेध केला आहे. पोलिसांचं कृत्य हिंसक असून हिंसा कोणत्याही समस्येचं समाधान असू शकत नाही, असं राजकुमारने म्हटलं आहे. नागरिकांना शांततेत विरोध प्रदर्शन करण्याचा अधिकार असल्याचं राजकुमारने म्हटलं.

Majha Vishesh | नागरिकत्व दुरुस्ती विरोध, पण हिंसेचं समर्थन? | ABP Majha

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : संविधान दिनी नागपुरात मोठा धमाका होणार, अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; भाजप सरकारवर गंभीर आरोप
संविधान दिनी नागपुरात मोठा धमाका होणार, अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; भाजप सरकारवर गंभीर आरोप
Akhilesh Yadav Facebook : मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Embed widget