एक्स्प्लोर

CAA Protest : हिंसक आंदोलनं दुर्दैवी, समता टिकवणं गरजेचं; मोदींचं आवाहन

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यापासून त्याचे देशभरात पडसाद उमटू लागले आहेत. त्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याबद्दल ट्वीट करुन लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याबद्दल ट्वीट करुन लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मोदींनी ट्वीट करुन म्हटले आहे की, ही शांतता टिकवून ठेवण्याची वेळ आहे. देशात एकता आणि बंधूभाव टिकवायला हवा. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी या हिंसक आंदोलनांपासून दूर राहावे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनांवर नरेंद्र मोदींनी सुरुवातीला मौन बाळगले होते. त्यामुळे मोदींवर टीका सुरु होती. परंतु आज मोदींनी व्यक्त होण्यासाठी नेहमीप्रमाणे ट्विटरचा आधार घेतला आहे. मोदींनी आज दुपारी लागोपाठ पाच ट्वीट्स करुन नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

मोदींनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सध्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी, सशक्त लोकशाही टिकवण्यासाठी, उपेक्षित आणि गरिबांच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, मी सर्व भारतीयांना आश्वस्त करु इच्छितो की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा भारतातल्या कोणत्याही नागरिकावर, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीवर काहीही परिणाम होणार नाही. कुणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही. हा कायदा केवळ घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आहे. तसेच हा कायदा भारताव्यतिरिक्त इतर देशात जागा नसलेल्या हिंदू, पारशी, जैन, शीख, ख्रिश्चन बांधवांना आपल्या देशाचं नागरिकत्व देण्यासाठी आहे.

मोदींनी म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 हा संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला आहे. दोन्ही सभागृहातील खासदारांनी मोठ्या संख्येने त्यास पाठिंबा दर्शवला आहे. हा कायदा देशाच्या शेकडो वर्षांपासूनची संस्कृती, स्वीकृती, प्रेम, करुणा आणि बंधुतेचं प्रतीक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget