एक्स्प्लोर

शशीकला नटराजन 29 जानेवारीला मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार?

चेन्नई: तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी AIADMK पक्षाच्या सरचिटणीस शशीकला नटराजन लवकरच विराजमान होण्याची शक्यता आहे. AIADMKने याबाबत काहीही अधिकृत घोषणा केली नसली तरीही तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात सध्या याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, रेडिफ या वेबसाइटनं असंही वृत्त दिलं आहे की, 'सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीला शशीकला नटराजन या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील.' शशीकला नटराजन यांची AIADMK पक्षाच्या सरचिटणीसपदी 29 डिसेंबरला निवड करण्यात आली होती. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल असा जाणकारांनी अंदाज वर्तविला होता. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, अवघ्या महिन्याभरातच त्यांना या पदावरुन पायउतार व्हावं लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी 29 जानेवारीच का? शशिकला यांच्या आवडीची तारीख आणि एक शुभ तिथी असल्यानं हा दिवस निवडला जाण्याची शक्यता. 27 जानेवारीला अमावस्या असून त्यानंतर उत्तरायण सुरु होणार आहे. त्यामुळे 29 जानेवारी ही तारीख निवडण्यात येऊ शकते. जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशीकला कोण? शशीकला नटराजन….जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती…या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही…कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं…तर कुणी…लिव्ह इन कम्पॅनियनही… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची… आजवर पडद्याआड वावरणारी शशीकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे. शशीकला आणि जयललितांची ओळख कशी? 1970 च्या सुमारास शशीकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. शशीकला नटराजन हिचा पती पीआरओ म्हणून काम करत होता. आणि तो ज्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होता, तो जयललितांच्या जवळ होता. एका व्हिडिओ शुटिंगच्या निमित्ताने झालेल्या या पहिल्याच भेटीत शशीकलानं जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच ती जयललितांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती बनली. एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशीकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता तिला आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशीकलानं आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30-35 लोकांची टीम बंगल्यावर तैनात केली. स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस, ड्रायव्हर असे सगळे तिच्या गोटातले….एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती एक जाळं विणल्यासारखंच होतं. जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या 1991 साली….पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक झाली. असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होती शशीकला. शशीकलाच्या कुटुंबातले लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात असल्याचे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी हे तर शशीकलाच्या या गोत्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असाच करायचे. शिवाय 1995 साली शशीकलानं आपला भाचा सुधाकरन जयललिलांना दत्तकपुत्र म्हणून दिला. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची इमेज निगेटीव्ह बनत चालली. बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता-शशीकला या दोघींवर एकत्र आरोप झाले. शशीकलाची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग 100 दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशीकलाचा कळवळा आला, आणि त्यांनी तिला माघारी बोलावलं. आता शेवटच्या श्वासापर्यंत शशीकला त्यांच्यासोबतच राहिली. जयललिता आजारी पडल्यापासूनच सगळ्यांना माहिती होतं की भविष्यात सगळा कारभार शशीकलाकडेच असणार…फक्त ती किंगमेकरची भूमिका पसंत करणार की स्वतःच किंग बनायला सरसावणार इतकाच प्रश्न होता. तूर्तास तरी तिनं पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली आहे. पण पनीरसेल्वम आणि शशीकला यांचे संबंध तितकेसे मधुर नाहीत. शिवाय जो करिष्मा, लोकप्रियता, लोकल टच जयललितांचा होता, तितका शशीकलाचा नाही. त्यामुळे ती किती घट्टपणे पक्षावर आपली कमांड ठेवू शकणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. शशीकला पुष्पा नावाची आणखी एक डीएमके खासदार आहे. तिच्यासोबत नुकतंच भांडण झालेलं आणि तिला हाकलून दिलं होतं. मात्र त्या शशीकलाचा याच्याशी काहीही संबंध नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget