एक्स्प्लोर
पाकिस्तानी कलाकारांना आमंत्रित केलं पाहिजे: शशी थरुर

मुंबई: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाशी निगडीत वादाबाबत बोलताना महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शशी थरुर यांच्या मते, 'पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या कलाकारांना, व्यापाऱ्यांना आणि सर्जनशील लोकांना भारतात आमंत्रित करण्याचं आपण समर्थन करतो.' टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हलमध्ये बोलताना थरुर म्हणाले की, 'आपण पाकिस्तानातील कलाकार , व्यावसायिक आणि सर्जनशील लोकांचं भारतात स्वागत करायला हवं.' तसेच करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाशी निगडीत वादाबाबत बोलताना थरुर म्हणाले की, 'याप्रकरणी काँग्रेसचा कोणताही मुख्यमंत्री मनसेसारख्या पक्षासोबत कधीही चर्चा करत नाही.' दरम्यान, सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यानं मनसेनं याचा जोरदार विरोध केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री, दिग्दर्शक करण जोहर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर मनसेनं आपला विरोध मागे घेतला होता.
आणखी वाचा























