एक्स्प्लोर
शक्तीकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर
शक्तीकांत दास यांनी केंद्रीय वित्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नोटाबंदीच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी काल रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. शक्तीकांत दास आरबीआयचे 25 वे गव्हर्नर ठरले आहेत.
शक्तीकांत दास यांनी केंद्रीय वित्त सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नोटाबंदीच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवहार सचिव, भारताचे राजस्व सचिव पदी काम केलं आहे.
कोण आहेत शक्तीकांत दास?
शक्तीकांत दास 1980च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत. गेल्या निवृत्तीनंतर दास भारताच्या 15 व्या वित्त आयोग आणि शेरपा जी-20 मध्ये सदस्य आहेत. याआधी दास यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये अर्थ विभागात काम केलं आहे. दास यांनी रिझर्व्ह बँकेचं कामकाज जवळून पाहिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement