एक्स्प्लोर
केवळ अभ्यासच नव्हे, तर यशासाठी हेही महत्त्वाचं, UPSC टॉपर टीनाचा सल्ला
नवी दिल्ली : यूपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते टिना दाबी या 22 वर्षीय तरुणीने. टिनाने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे, त्यामुळे तिचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. केवळ मेहनत, जिद्द, संवेदनशीलता यांच्या बळावरच हे बळ मिळवलं, असं टिनाने ' एबीपी माझा' दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.
टिनाने मिळवलेल्या यशाबद्दल सांगताना यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे अनुभव शेअर केले आहेत.
पूर्वतयारी आणि कठोर मेहनत
माझं आयुष्याचं ध्येय आधीच निश्चित होतं. त्यामुळे माझा मार्ग सरळ होता, त्यात कसलाही अडथळा नव्हता किंवा कसलाही मानसिक गोंधळ नव्हता, असं टिना सांगते. कॉलेजमध्ये शिकत असतानाच यूपीएससी करायची ठरल्यामुळे विषयाची निवड आधीच केली होती. त्यामुळे अभ्यास करणं अधिक सोप झालं, असं टिना सांगते.
स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेचा कस यूपीएससीचा अभ्यास करताना लागतो. केवळ क्षमता असणं चालत नाही तर ती वापरण्याची कला देखील अवगत करावी लागते, असा सल्ला टिना देते.
यूपीएससी टॉपर टिना दाबीचं मराठमोळं कनेक्शन
वेळेशी सामना करण्याची क्षमता हवी यूपीएससीचा अभ्यास सतत चालू ठेवावा लागतो. पण याचा मेंदूवर अनेकदा विपरीत परिणाम होतो. मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं. आपण रोज किमान 8-10 तासांपोक्षा जास्त अभ्यास करतो. शारिरीक संतुलनही बिघडतं. त्यामुळे स्वतःसाठी राखीव वेळ असणं गरजेचं आहे. अभ्यास चालू असतानाही मी वेळ काढून फिरायला जायचे, मित्र-मैत्रिणी आणि कुटंबाला वेळ द्यायचे असे टिना सांगते. यामुळे अधिक चांगला अभ्यास झाला असं टिना सांगते. यूपीएससीचा अभ्यास करताना डिप्रेशनवर मात करणं, संवेदनशीलता ठेवणं आणि कठोर परिश्रम करणं हेच यशाचे सूत्र आहे, असं टिनाने सांगितले. अशी झाली यूपीएससीची मुलाखत मुलाखतीला जाताना वेगवेगळे विचार मनात येत होते. मात्र नकारात्मक विचारांमुळे आपण अनेकदा आत्मविश्वास हरवतो, त्यामुळे मुलाखतीसाठी फक्त आत्मविश्वास एकवटणं गरजेचं असल्याचं टिनाने सांगितलं. एकूण 40 ते 45 मिनिटे मुलाखत चालली. सर्व प्रश्न जगातील चालू घडामोडींवरील होते, त्यामुळे मुलाखत देताना काहीच अडथळा आला नाही, असं टिनाने नमूद केलं.डोळे उघडणारं यश... मराठमोळ्या प्रांजलीचा यूपीएससीतील संघर्षमय प्रवास
महिलांसाठी काम करण्याची इच्छा टिनाने आपल्या पहिलीच नियुक्तीसाठी हरियाणा कॅडर निवडलं आहे. महिलांच्या समस्यांवर काम करण्यासाठी हरियाणा योग्य राज्य असल्याचं टिना सांगते. हरियाणामध्ये महिलांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. आजही महिलांना घराबाहेर निघण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे महिलांच्या अशा समस्यांसाठी माझी कारकीर्द समर्पित असेल, असं टिनाने सांगितलं. पाहा व्हिडीओअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement