एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्यात टूरिस्ट टॅक्सी चालकांचा संप चिघळला
गोव्यात टूरिस्ट टॅक्सीमालकांच्या मागण्यांवर तोडगा येऊ न शकल्याने आजही टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पणजी : गोव्यात टूरिस्ट टॅक्सीमालकांच्या मागण्यांवर तोडगा येऊ न शकल्याने आजही (शनिवार) टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत. कालपासून (शुक्रवार) पुकारलेल्या संपामुळे पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. सुमारे २0 हजार टूरिस्ट टॅक्सी बंद आहेत.
स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मीटरला विरोध करीत गोव्यातील टॅक्सी मालकांनी बंद पुकारला आहे. सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर चालणाऱ्या अवघ्या काही निवडक टॅक्सी वगळता सुमारे ९५ टक्के टॅक्सी काल बंद होत्या. सर्व प्रमुख हॉटेलांच्या आवारात तसेच रेल्वे स्थनके, दाबोळी विमानतळ तसेच बसस्थानकांच्या आवारात असलेल्या टूरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या. काळ्या-पिवळ्या टॅक्सींनी या संपात सहभाग न घेतल्याने त्या मात्र चालू आहेत.
टूरिस्ट टॅक्सींचा संप चिरडण्यासाठी सरकार जर ‘ओला’ किंवा ‘उबेर’ची सेवा गोव्यात सुरु करण्याचा विचार करीत असेल तर आम्ही चाळीसही आमदारांविरुध्द काम करु आणि त्यांच्याविरुध्द आघाडी उघडू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचं टॅक्सीमालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच शुक्रवारचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे टॅक्सी मालकांचा बंद मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला आहे.
जीटीडीसीच्या 10 बसगाड्या सेवेत
दरम्यान, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल यांनी जीटीडीसीच्या 10 बसगाड्या सेवेत आणल्या जातील, अशी माहिती दिली आहे.
दाबोळी विमानतळ तसेच करमळी, थिवी, मडगांव, वास्को आदी रेल्वे स्थानकांवर कोकण कन्या, जनशताब्दी, डबल डेकर, मांडवी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आदी रेलगाड्या पोचण्याच्या वेळेतही बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे.
या बसगाड्यांना विशेष तिकिट असणार आहे. विमानतळ ते पणजी तसेच विमानतळ ते मडगांव प्रत्येकी 100 रुपये, विमानतळ ते कळंगुट, विमानतळ ते फोंडा प्रत्येकी 150 रुपये, विमानतळ ते म्हापसा 125 रुपये तिकिट आकारले जाईल. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत बस सेवा असेल. ‘दाबोळी’वर दिवसाकाठी सरासरी 80 विमाने उतरतात.
दोन कंट्रोल रुम
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0832-2794100 या क्रमांकावर तर उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0832-2225283 या क्रमांकावर संपर्क साधून पर्यटकांनी त्यांची अडचण सांगितल्यास पर्यटन खात्याचे अधिकारी आवश्यक ते साहाय्य करतील. याशिवाय जीटीडीसीच्या रेसिडेन्सींमध्ये माहिती केंद्रे उघडण्यात आलेली आहेत.
काब्राल म्हणाले की, टूरिस्ट टॅक्सीवाले पर्यटकांकडून बेसुमार पैसे आकारले जातात याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे डिजिटल मिटर प्रत्येकाने बसवायलाच हवेत. स्पीड गव्हर्नरची सक्ती कोर्टाने केलेली आहे त्यामुळे त्याची अंमलबजावणी करायलाच हवी. बेसुमार भाडे आकरणी किंवा वरचेवर बंद पुकारु न पर्यटकांना वेठीस धरले जात असल्याने गोव्याचे नाव बदनाम होत आहे. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. आजपावेतो आम्ही संयम पाळला परंतु यापुढे कोणाचीही तमा न बाळगता ‘उबर’, ‘ओला’सारख्या टॅक्सीसेवा गोव्यात आणल्या जातील. ते पुढे म्हणाले की, टॅक्सीवाल्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी सरकारने केलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी संपावर जाऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. काळ्या-पिवळ्या टॅक्सी संपात सहभागी होणार नसल्याने त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
संंबंधित बातम्या :
गोव्यात टुरिस्ट टॅक्सींचा संप, पर्यटकांची परवड, ‘एस्मा’ लागू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement