Scorpio Accident: चेकिंग सुरु असताना 90 किमी वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडले; महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू, एसआय-एएसआय हवेत उडून रस्त्यावर कोसळले
Scorpio Accident : एसआय दीपक कुमार, एएसआय अवधेश आणि महिला कॉन्स्टेबल कोमल यांना दिघाहून ताशी 90 किमी वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने धडक दिली आणि ते हवेत फेकले गेले आणि दूर जाऊन रस्त्यावर आदळले.

Scorpio Accident : वाहनांची तपासणी सुरू असताना एका 90 किमी वेगाने येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओने 3 पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडले. या भयंकर घटनेत अवघ्या 25 वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. एसआय आणि एएसआय स्कॉर्पिओच्या धडकेत थेट हवेत उडून रस्त्यावर आदळले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. ही घटना पाटण्यामध्ये अटल पथवर एसकेपुरी पोलिस स्टेशन परिसरात घडली. स्कॉर्पिओवर भाजपचा झेंडा होता.
एसआय आणि एएसआयची प्रकृती चिंताजनक
एसआय दीपक कुमार, एएसआय अवधेश आणि महिला कॉन्स्टेबल कोमल यांना दिघाहून ताशी 90 किमी वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने धडक दिली आणि ते हवेत फेकले गेले आणि दूर जाऊन रस्त्यावर आदळले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत जखमी झालेल्या चौघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे महिला कॉन्स्टेबल कोमलचा मृत्यू झाला. कोमल ही नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होती. एसआय आणि एएसआयची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलिस तपासणी करत असल्याचे दिसून येते. जहानाबादमधील घोसी भाखरा येथील रहिवासी प्रिन्स कुमारची स्कॉर्पिओ तपासली जात होती. दरम्यान, वेगाने येणाऱ्या दुसऱ्या स्कॉर्पिओने पार्क केलेल्या स्कॉर्पिओ आणि पोलिसांना धडक दिली. कोमल कुमारी डायल 112 मध्ये तैनात होती.
या घटनेत मृत्युमुखी पडणारी महिला कॉन्स्टेबल कोमल कुमारी फक्त 25 वर्षांच्या आहेत. त्या डायल 112 मध्ये तैनात होत्या. नेहमीप्रमाणे बुधवारीही त्या डायल 112 टीमसोबत पोलिस चेकिंग करत होत्या. यादरम्यान स्कॉर्पिओने उडवलं. या घटनेत कार चालक प्रिन्स कुमार देखील जखमी झाला. तो पाटण्याहून जहानाबादमधील घोसी भाक्रा येथील त्याच्या घरी जात होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका स्कॉर्पिओने त्याला धडक दिली. पोलिस त्याची कार तपासत होते.
एक स्कॉर्पिओ थांबवण्यात आली तेव्हा दुसरी पोलिसांवर आदळली
माहितीनंतर एसएसपी अवकाश कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, पोलिस दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. एसएसपी अवकाश कुमार म्हणाले की, 'रात्री साडे दहा ते मध्यरात्री साडे बारा वाजेपर्यंत राजधानीसह सर्व जिल्ह्यांमध्ये वाहन तपासणी करण्यात आली. अटल पथावर एसके पुरी पोलिस स्टेशनकडून बॅरिकेडिंग करून तपासणी करण्यात येत होती.' 'यादरम्यान, एका वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने तपासणी सुरू असलेल्या कारला धडक दिली. त्यामुळे कार तपासणारे 3 पोलिस जखमी झाले. सर्वांवर उपचार सुरू आहेत. चालक फरार आहे. कारवाई केली जात आहे.' 'दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. चालक फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत.'
इतर महत्वाच्या बातम्या























