पोटच्या पोराला संपवलं, राजा रघुवंशीच्या आईला 'बेवफा' सोनमचा भाऊ भेटला अन् दोघेही धायमोकलून रडले, नक्की घडलं काय?
सोनम रघुवंशीच्या वाढत्या गदारोळात आज तिचा भाऊ गोविंदने राजा रघुवंशीच्या आईला भेटला. राजाच्या हत्येनंतर दोघेही धायमोकलून रडले. राजाच्या आईजवळ त्याने त्याच्या बहिणीचा सोनमचा राग व्यक्त केला.

Sonam Raghuwanshi: इंदौरचे सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरणाची सध्या मोठी चर्चा आहे. राजाला मधुचंद्राला घेऊन जात प्रियकरासह दोघांना सुपारी दिली आणि राजा रघुवंशीची सोनमने हत्या केल्याचं तपासात उघड झालं. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, सोनम रघुवंशीच्या वाढत्या गदारोळात आज तिचा भाऊ गोविंदने राजा रघुवंशीच्या आईला भेटला. राजाच्या हत्येनंतर दोघेही धायमोकलून रडले. राजाच्या आईजवळ त्याने त्याच्या बहिणीचा सोनमचा राग व्यक्त केला.
नेमकं झालं काय?
सोनमचा भाऊ गोविंद भेटल्यानंतर,राजा रघुवंशीच्या आईने गोविंद आणि तिच्या भेटीत काय झालं ते सांगितलं. त्या म्हणाल्या,"...गोविंद म्हणाला की सोनमला फाशी द्यायला हवी. गोविंदला सोनमसाठी नाही तर राजासाठी दुःख आहे...गोविंदची चूक नाही." मी गोविंदला विचारले की तो सोनमला भेटला का? त्यावर तो म्हणाला की तो तिला तीन मिनिटांसाठी भेटला. मी त्याला विचारले की त्याने तिला का मारले नाही? तो म्हणाला की मीडिया आणि पोलिस असल्याने त्याला संधी मिळाली नाही. राजा रघुवंशीच्या आईला भेटल्यानंतर गोविंदनेही सांगितलं की, कुटुंबानं सोनमशी सगळे संबंध तोडले आहेत. "सोनमने स्वतःला दोषी मानले नाही. तिच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. आम्ही तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. आम्ही राजााच्या वतीने लढू..." असे तो त्याच्या गाडीत बसण्यासाठी धडपडत म्हणाला. तो पुढे म्हणाला, “राज कुशवाहा तिला नेहमीच 'दीदी' म्हणायचा. गेल्या तीन वर्षांपासून सोनम राज कुशवाहाला राखी बांधत आहे...” असंही त्यानं सांगितलं.
हवाला कनेक्शन
तपासात असे दिसून आले आहे की, राजच्या फोनवरून अनेक हवाला व्यवहारांचे संकेत मिळाले आहेत. हवाला व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नोटांचे फोटोही फोनमध्ये सापडले आहेत. सर्वात मोठा खुलासा म्हणजे सोनम रघुवंशीचे बँक खाते हवाला व्यवहारात वापरले गेले. राजाची हत्या आवेगाने झाली नव्हती, तर नियोजनानुसार झाली होती. राजने पिथमपूरमधील एका हवाला व्यापाऱ्याकडून 50000 रुपये उधार घेतले होते, जे त्याने हत्येपूर्वी त्याच्या तीन मित्रांमध्ये वाटले होते. ही रक्कम कदाचित हत्येच्या तयारीसाठी वापरली गेली असावी, अशी शक्यता आहे.
हेही वाचा
























