एक्स्प्लोर
स्कॉर्पिन पाणबुडीचं प्रकरण गंभीर नाही, संरक्षणमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली : स्कॉर्पिन पाणबुडीची कागदपत्रं फुटल्याने देशात खळबळ उडाली होती. मात्र शनिवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रकरण गंभीर नसल्याचा दावा केला आहे.
स्कॉर्पिन संदर्भात गोपनीय कादगपत्रं लीक झाल्यानंतर पर्रिकरांनी नौदलाला प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन पत्रकाराच्या बातमीत पाणबुडीच्या शस्त्रास्त्रांसंदर्भात माहिती नसल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं. मात्र पत्रकार कॅमरन स्टीवर्ट
यांनी पर्रिकरांचा हा दावा ट्विटवरवरुन तात्काळ खोडून काढला.
फ्रान्स बनावटीच्या स्कॉर्पिन पाणबुडीची गोपनीय माहिती लीक
भारताचे संरक्षणमंत्री चुकीची माहिती देत आहेत, आमच्याकडे पाणबुडीच्या शस्त्रांस्त्रांसंदर्भातलीही माहिती आहे आणि सोमवारी आम्ही ती उघड करु असं पत्रकार स्टीवर्टने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/camstewarttheoz/status/769176304042151936 ही कागदपत्रं जाहीर करताना भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कोणतीही बाधा येणार नाही याची काळजीही घेतली जाईलं, असं स्टीवर्टने नमूद केलं आहे. https://twitter.com/camstewarttheoz/status/769178059396100096 भारतीय नौदलात लवकरच रुजू होणाऱ्या फ्रान्स बनावटीच्या स्कॉर्पिन पाणबुडीबद्दलची हजारो कोटींची गोपनीय माहिती लीक झाली होती. ऑस्ट्रेलियातील मीडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं. गोपनीय माहिती तब्बल 22 हजार 400 पानांची असून ती उघड झाल्याने संरक्षणदलात खळबळ उडाली होती. फ्रान्स बनावटीची स्कॉर्पिन पाणबुडी भारतीय नौदलात रुजू होणारी स्कॉर्पिन पाणबुडी ही फ्रान्स बनवावटीची आहे. ही पाणबुडी कशी आहे, तिचा वापर कसा होतो, त्याचे फिचर्स काय आहेत? ही आणि अशी सर्व माहिती लीक झाली आहे. या पाणबुडीचं ऑपरेटिंग मॅन्यूअल लीक झाल्याने, ही माहिती कोणाकडून आणि कशी लीक झाली याची आता चौकशी होणार आहे.आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
अहमदनगर
Advertisement
Advertisement

















