एक्स्प्लोर
दहशतवादाविरोधात पूर्ण सहकार्य करण्याचं सौदीच्या प्रिन्सचं आश्वासन, पुलवामा हल्ल्यावर मौन
भारतदौऱ्यावर आलेले सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पाच करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यात सुरक्षा करारावरही चर्चा झाली.
नवी दिल्ली : पाकिस्तानचा दौरा संपवून सौदीचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं सौदीच्या प्रिन्सचं आश्वासन दिलं आहे.
दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पूर्ण सहकार्य आश्वासन दिले खरे पण राजपुत्रांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्ल्यावर चकार शब्द काढला नाही. एकीकडे पुलवामा हल्ल्याचा निषेध करत जगातील 40 देशांनी भारताला समर्थन दिलं. मात्र सौदीचे राजपुत्र मात्र गुळूगुळू बोलून निघून गेले.
VIDEO | सौदी अरेबियासोबत महत्त्वपूर्ण करारांनंतर पंतप्रधान मोदींचं भाषण | नवी दिल्ली | एबीपी माझा
भारतदौऱ्यावर आलेले सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पाच करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यात सुरक्षा करारावरही चर्चा झाली. त्यानंतर सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. पुलवामा हल्ल्यानंतर सौदीच्या राजपुत्रांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता आणि पाकिस्तानचा दौरा संपवून ते भारतात आले होते.
सौदीच्या राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानवर दबाव टाकावा अशी भारताला आशा होती. मात्र मोदींसोबतच्या पत्रकार परिषदेत राजपुत्रांनी पुलवामा हल्ल्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. 'कट्टरतावाद व दहशतवादासारख्या मुद्द्यावर आम्ही भारताच्या सोबत आहोत. गुप्तचर यंत्रणेसह अन्य सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची आमची तयारी आहे,' असं सलमान म्हणाले.
VIDEO | सौदीच्या राजकुमाराची डबल ढोलकी? | माझा हस्तक्षेप | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement