एक्स्प्लोर

भाजपविरोधात मुंबईत विरोधकांची संविधान बचाव रॅली

महत्त्वाचं म्हणजे या रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारची सभा किंवा घोषणाबाजी होणार नाही. रॅली पूर्ण झाल्यानंतर दोन तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाजप सरकारविरोधात मुंबईत आज विरोधकांची संविधान बचाव रॅली निघणार आहे. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार असून गेट वे ऑफ इंडियावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सांगता होईल. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून संविधान बचाव रॅली निघणार आहे. कोणत्याही झेंड्याखाली न येता संविधानाला धक्का लागू नये यासाठी अराजकीय रॅली काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आज निघणाऱ्या या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शरद यादव, माकप नेते सीताराम येचुरी, डी राजा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी नेता यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहतील. पवार, येचुरी, हार्दिक पटेल.. 26 जानेवारीला संविधान बचाव सत्याग्रह देशातील सामाजिक सलोखा बिघडलेला असून अनेक ठिकाणी जातीय दंगली घडवल्या जात आहेत. यामधूनच राजकीय पोळी भाजण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे राज्यघटनेवरील विश्वासाला तडा जात आहे. लोकांच्या मनात भीतीचं वातावरण असून अनेक समाज दबावाखाली आले आहेत. न्यायालयीन व्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेप, शेतकऱ्यांमधील असंतोष थांबावा, यासाठी सर्वपक्षीय अराजकीय संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला या संविधान बचाव रॅलीली मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली होती. परंतु कोणत्याही परिस्थितीत रॅली होणारच असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रॅलीत सहभागी व्हावं किंवा प्रतिनिधी पाठवावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारची सभा किंवा घोषणाबाजी होणार नाही. रॅली पूर्ण झाल्यानंतर दोन तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
Embed widget