एक्स्प्लोर

अखिलेश आणि मुलायम सिंह यादव यांचा पक्षाच्या चिन्हावर दावा

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर सध्या समाजवादी पक्षातील यादवीचे वादळ घोंघावत आहे. सध्या हे वादळ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून दिल्लीकडे सरकले असले, तरी पिता-पुत्रातील गृहकलह अद्याप क्षमलेला नाही. आज समाजवादी पक्षातीलच दोन्ही गटाच्या नेत्यांनी निवडणुक आयोगाकडे हजेरी लावून पक्षाच्या चिन्हासाठी दावा सांगितला आहे. आता यावर निवडणूक आयोगाला 17 जानेवारीपर्यंत निर्णय द्यायचा आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी आज सकाळी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट देऊन मतभेदासंदर्भात माहिती दिली, तसेच यावर लवकरच तोडगा काढला जाईल असेही स्पष्ट केलं. या भेटीवेळी मुलायम सिंह यादव यांच्यासह शिवपाल यादव आणि अमर सिंह हेही उपस्थित होते. जवळपास एक तास झालेल्या बैठकीनंतर अखिलेश माझा मुलगा असून आमच्यातील मतभेदांवर लवकरच तोडगा काढला जाईल असे मुलायम सिंह यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मुलायम सिंह यादव यांनी याआधी राज्यसभेच्या अध्यक्षांनाही पत्र लिहून अखिलश यादव यांच्या गटातील रामगोपाल यादव यांना पक्षनेते पदावरुन हटवण्याची मागणी केली. त्यामुळे हा गृहकलह आणखीनच वाढला आहे. मुलायम सिंह यादव यांच्या भेटीनंतर रामगोपाल यादव यांनीही आयोगाच्या कार्यालयात हजेरी लावून कागदपत्रांची पुर्तता केली. यानंतर माध्यमांशी बोलताना रामगोपाल यादव यांनी शिवपाल यादव आणि अमर सिंह यांच्यावर हल्ला चढवला. रामगोपाल यादव म्हणाले की, ''काही व्यक्ती नेताजींची फसवणूक करत असून, त्यांना 200 विधायकांचे समर्थन असल्याची खोटी माहिती देत आहेत. पण आता यातलं सत्य बाहेर आलं आहे.'' तसेच तडजोडीचे सर्व मार्ग बंद झाले असल्याचे सांगितले. वास्तविक, ज्या व्यक्तीकडे निवडणून आलेल्या आमदारांच्या बहुमताची मॅजिक फिगर असेल, त्यांच्याकडेच पक्षाची धुरा सोपवली जाते. सध्या यादव कुटुंबांतील पिता-पुत्राच्या संघर्षामुळे पक्षाचे सायकल हे चिन्ह कुणाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातच निवडणूक आयोगात हे प्रकरण गेल्याने आयोगालाही यावर 17 जानेवारी पूर्वी निर्णय घोषित करणे गरजेचे आहे. कारण याच दिवशी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान 2 फेब्रुवारी रोजी होणार असून, अधिसूचना जाहीर झाल्यानंतर नामांकन अर्जाची सर्व प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अखिलेश आणि मुलायम सिंह यादव यांच्या गटातील उमेदवारांना पक्षाच्या एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येणार नसल्याने, सध्या उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
देशातील वीज संकट अधिक गडद! 9 राज्यांकडून अतिरिक्त विजेची मागणी, रात्री अंधार पसरणार का? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
Embed widget