एक्स्प्लोर
आरक्षणाला संघाचं पूर्ण समर्थन : मोहन भागवत
“सामाजिक विषमता नाहीशी करुन, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून घटना बनवली गेलीय. घटनेने आरक्षणाची जी व्यवस्था तयार केलीय, तिला संघाचं पूर्ण समर्थन आहे."
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलंय. राज्यघटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे, त्यास संघाचं पूर्ण समर्थन आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच, एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये, असंही भागवत म्हणाले.
दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
भागवत नेमकं काय म्हणाले आरक्षणावर?
“सामाजिक विषमता नाहीशी करुन, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून घटना बनवली गेलीय. घटनेने आरक्षणाची जी व्यवस्था तयार केलीय, तिला संघाचं पूर्ण समर्थन आहे. आता हे आरक्षण कधीपर्यंत ठेवायचं हे त्यांनीच ठरवायचंय, ज्यांना लाभ मिळतोय. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते क्रिमीलेयरचं काय करायचं ते ठरवतील. आरक्षण समस्या नसून, आरक्षणावरील राजकारण ही समस्या आहे. जे खड्ड्यात पडले आहेत, त्यांच्या हातात हात देऊन आपण वर आणलं पाहिजे. एक हजार वर्षांपासूनचा अन्याय दूर करण्यासाठी 100-150 वर्षे झुकून राहावं लागलं, तर ती मोठी गोष्ट नाही. सर्वच आपले आहेत.”, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
एससी-एसटी अॅक्टवर काय म्हणाले भागवत?
“जी परिस्थिती आहे, ती दूर करण्यासाठी कायदा बनवला गेलाय. त्या कायद्याला नीट लागू केला पाहिजे. त्याचा दुरुपयोग व्हायला नको. सद्भावना निर्माण करण्याची मोठी गरज आहे. संघाची इच्छा अशीय की, सामाजिक सद्भावाने या गोष्टी सोडवल्या पाहिजेत.”, असे एससी-एसटी अॅक्टवर बोलताना मोहन भागवत म्हणाले.
परवाच्या भाषणात काय म्हणाले होते भागवत?
परवा म्हणजे 18 सप्टेंबर रोजी मोहन भागवत यांनी याच कार्यक्रमात भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजपसंबंधित महत्त्वाच्या विषयांवर आपलं मत व्यक्त केले होते. नागपुरातून सरकार चालवलं जातं, या विरोधकांच्या आरोपांना परवा भागवतांनी उत्तर दिले होते.
ते म्हणाले होते, “हा जो अंदाज लावला जातो, की नागपुरातून फोन जातो. सल्ला दिला जातो की कुणी काय करायचं? हे सर्व खोटं आहे. त्यांना सल्ला हवा असेल, तरच सल्ला दिला जातो”
तसेच, ''राजकारणावर आमचा कोणताही प्रभाव नाही आणि त्यांच्या सरकारवरही आमचा प्रभाव नाही. ते स्वयंसेवक आहेत. त्यांचाही स्वतःचा विचार आहे. या स्वातंत्र्याने आणि स्वायत्ततेनेच सरकार चालवलं जातं. घटनेनुसार सत्तेचं केंद्र अबाधित राहिलं पाहिजे, असं संघाचं मत आहे आणि असं न झाल्यास ते चुकीचंच असेल,'' असंही मोहन भागवत म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement