एक्स्प्लोर
खात्यात अचानक 9,99,99,999 रुपये जमा, SMS पाहून धक्का
एसएमएस पाहून त्याला धक्का बसला. एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यात कोण जमा करु शकतं, हा विचार त्याच्या डोक्यात आला. पैसे कुठून आले हे समजू शकलेलं नाही. मेसेजची माहिती त्याने मित्रांनाही दिली होती.
नवी दिल्ली : बँक खात्यात 9,99,99,999 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, तर कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मोबाईल शॉप चालवणाऱ्या एका तरुणाच्या मोबाईलवर असाच मेसेज. आपण एका क्षणात कोट्यधीश झालो, ह्यावर त्याचा विश्वास बसेना.
खात्यात 9 कोटी, 99 लाख, 99 हजार 999 रुपये पाहून त्यालाच काय कुटुंबीयांनाही धक्का बसला. पण कोट्यधीश बनण्याचा आनंद काही क्षणच टिकला. तरुण पैसे काढण्यासाठी गेला असता, त्याला अकाऊंट ब्लॉक झाल्याचं समजलं.
विनोद कुमार कुटुंबासह जहांगीरपुरी परिसरात राहतो. घराजवळच तो एक मोबाईल शॉप चालवतो. जहांगीरपुरी एसबीआय ब्रान्चमध्ये त्याचं बचत खातं आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास 9,99,99,999 रुपये जमा झाल्याचा एसएमएस झाला.
एसएमएस पाहून त्याला धक्का बसला. एवढी मोठी रक्कम आपल्या खात्यात कोण जमा करु शकतं, हा विचार त्याच्या डोक्यात आला. पैसे कुठून आले हे समजू शकलेलं नाही. मेसेजची माहिती त्याने मित्रांनाही दिली होती.
एटीएममध्ये जाऊन बॅलन्स चेक करण्याचा सल्ला सगळ्यांनी दिला. विनोद अनेक एटीएममध्ये गेला. रविवारी दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी अकाऊंटमध्ये 9,99,99,999 रुपये जमा झाल्याचं त्याला समजलं. विनोदने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याचं अकाऊंट ब्लॉक झालं होतं. विनोद सोमवारी सकाळी पासबुक घेऊन बँकेत गेला, पण गर्दी असल्याने तो बँकेबाहेरुनच परत आला.
विनोदच्या अकाऊंटमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याची बातमी आगीसारखी पसरली आणि त्याच्या घरी गर्दी होऊ लागली आहे. काही जण विनोदची थट्टा करत आहेत, तर काही जण त्याला बंगला विकत घेण्याचा सल्ला देत आहेत .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement