देशात विजेच्या मागणीत विक्रमी वाढ, दोन लाख मेगावॅटपेक्षा जास्त वापर; मात्र कोळशाचा तुटवडा
Electricity Demand In India: दिल्लीसह देशातील अनेक राज्यांतील लोकांना सध्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
Electricity Demand In India: दिल्लीसह देशातील अनेक राज्यांतील लोकांना सध्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, झारखंड, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे आहे, अशा स्थितीत अनेक ठिकाणी केवळ सात ते आठ तास वीज मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 2:50 वाजता संपूर्ण भारतातील विजेची मागणी 20,7111 MW वर पोहोचली आहे. जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.
पॉवर प्लांट्समधील कोळशाचा साठा कमी होत असल्याच्या वृत्तांदरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, देशातील प्रकल्पांमध्ये सुमारे 22 दशलक्ष टन कोळसा आहे, जो 10 दिवस पुरेसा असून तो सतत भरला जाईल. अशा परिस्थिती झारखंड, हरियाणा, बिहार, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होतो, जेथे सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. अत्यावश्यक सेवांमधील वीज कपातीच्या शक्यतेबाबत दिल्लीने केंद्राला पत्रही लिहिले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पावले उचलत आहेत.
वीज संकटाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची मोठी बैठक घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला 25 हजार मेगावॅट विजेची गरज आहे, त्या तुलनेत राज्याला केवळ 21 ते 22 हजार मेगावॅट वीज मिळत आहे. राज्य सरकारने अदानी पॉवर (APML) आणि JSW पॉवरला केंद्रीय विद्युत कायदा आणि MERC कायद्याअंतर्गत नोटिसा पाठवल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली असून, त्याविरोधात नागपूरात लोकांनी कंदील घेऊन आंदोलन केले. वीजेचा वापर जपून करावा, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :