एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून इन्फोसिसच्या 3000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार
नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील प्रकल्प रद्द होण्यावरून नुकतेच इन्फोसिसने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा (RBS) ब्रिटेनमधील एक प्रकल्प रद्द होण्याने तब्बल 3000 कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार आहे.
आरबीएसने गेल्याच आठवड्यात इन्सफोसिसची प्रायोगिक भागिदारी असलेला, ब्रिटेनमध्ये बँक विलियम्स अॅन्ड गिल्न (W&G) उभारणे आणि त्याचे लिस्टिंग करण्याची योजना पुढे चालू ठेवणार नसल्याचे जाहीर केले होते. आरबीएस स्कॉटलंडने इन्फोसिसला यूकेमध्ये एक वेगळी बँक स्थापन करण्याची जबाबदारी दिली होती. या प्रकल्पाची किंमत 2500 कोटी रुपये होती. यासाठी इन्फोसिसकडे 1650-1700 कोटी रुपये जमा होणे अपेक्षित होते. तसेच या प्रकल्पासाठी 3000 कर्मचारी काम करणार होते. पण हा प्रकल्पच रद्द झाल्याने या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येईल, असे इन्फोसिसने स्पष्ट केले आहे. तसेच आरबीएससोबत आपली मजबूत भागिदारी असल्याचे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ब्रेक्झिटपूर्वी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड यूकेमध्ये एक वेगळी बँक विलियम्स अॅन्ड गिल्न (W&G) सुरु करण्याच्या तयारीत होती. या प्रकल्पात इन्फोसिस प्रायोगिकतत्वावर सल्लागार, अॅप्लिकेशन डिलिव्हरी आणि सेवा परिक्षणामध्ये भागीदार होती. बँकेच्या कामकाजाची जबाबदारीही इन्फोसिसकडे देण्यात आली होती. मात्र, बेक्झिटमुळे आरबीएसने यूकेमधील हा प्रकल्पच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासाठी इन्फोसिसची सेवा घेण्यासाठी तब्बल 1700 कोटींचा प्रकल्प देऊ केले होता. हा प्रकल्पदेखील कंपनीने रद्द केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
विश्व
Advertisement