एक्स्प्लोर
लवकरच एक रुपयाची नवी नोट चलनात येणार!
![लवकरच एक रुपयाची नवी नोट चलनात येणार! Rbi Will Soon Put Into Circulation Currency Notes In One Rupee Denomination लवकरच एक रुपयाची नवी नोट चलनात येणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/30204802/one-rupee-note.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्र सरकार एक रुपयाची नोट जारी करणार आहे. नव्या नोटा चलनात आल्या तरी जुन्या नोटाही चालू राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतीत घोषणा केली आहे.
जवळपास दोन दशकांपर्यंत एक रुपयांच्या नोटेवर बंदी ठेवल्यानंतर 2015 साली या नोटा पुन्हा बाजारात आणण्यात आल्या. नव्या नोटेच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, केवळ रंग बदलण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
एक रुपयाची नोट सरकारकडून चलनात आणली जाते आणि त्यावर अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची स्वाक्षरी असते. तर इतर नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते.
एक रुपयांच्या नवीन नोटांची छपाई झाली असून या नोटा लवकरच चलनात येतील, असं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटलं आहे. नव्या नोटेवर 'GOVERNMENT OF INDIA' च्या वर देवनागरीमध्ये 'भारत सरकार' असं लिहिलेलं असेल.
सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर नव्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)