एक्स्प्लोर
50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा
नोटेच्या मागच्या बाजूला रथासोबत हम्पीच्या मंदिराचं चित्र असेल. नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असतील.
नवी दिल्ली : आरबीआयने 50 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची घोषणा केली आहे. पन्नास रुपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील.
काही दिवसांपासून 50 रुपयांच्या नव्या नोटेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आरबीआयच्या घोषणेमुळे हे फोटो खरे असल्याचं समोर आलं आहे. नोटेच्या मागच्या बाजूला रथासोबत हम्पीच्या मंदिराचं चित्र असेल. नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असतील.
50 रुपयांची नवी नोट कशी असेल?
पन्नास रुपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. मध्यभागी महात्मा गांधी यांचं चित्र असेल. देवनागरीतही पन्नास लिहिलेलं असेल. सिक्युरिटी थ्रेडवर भारत आणि आरबीआय असं लिहिलेलं असेल. मायक्रो लेटर्समध्ये 'RBI भारत INDIA आणि 50' असं लिहिलं असेल.
नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ असेल. सर्वात वर डाव्या बाजूला पॅनलवरील नंबर लहानापासून आकाराने मोठे होत जातील.
नोटेच्या मागच्या बाजूचे फीचर्स :
डाव्या बाजूला नोट जारी करण्याचं वर्ष लिहिलं असेल. स्वच्छ भारतचा लोगोही असेल. हम्पीच्या मंदिराच्या आधी किंवा डावीकडे लँग्वेज पॅनल असेल.
गेल्या वर्षीच आरबीआयने 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती. या नोटा रिझर्व्ह बँक महात्मा गांधी सीरीज- 2005 मधील असतील, असं आरबीआयने म्हटलं होतं. दोन्ही नंबर पॅनलच्या मध्ये इनसेट लेटर नसेल, असं आरबीआयने तेव्हा स्पष्ट केलं होतं.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी या नोटेवर असेल. सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटांप्रमाणेच सिक्युरिटी फीचर्स असतील, असं आरबीआयने म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement