एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये किती रक्कम परत आली?
नोटाबंदीच्या काळात देशातील विविध बँकांमधील काही विशिष्ट खात्यांमध्ये Unusually (वापरात कमी असलेल्या बँक खात्यांमध्ये अचानक रोकड जमा होणे) रोकड जमा झाली. ही रक्कम 1.6 ते 1.7 लाख कोटी रुपये इतकी होती. रिझर्व बँकेच्या वेबसाईटवर प्रकाशित एका शोधनिबंधाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात देशातील विविध बँकांमध्ये किती रक्कम जमा झाली, याची अधिकृत आकडेवारी अद्याप रिझर्व बँकेने जाहीर केली नाही. पण रिझर्व बँकेच्या वेबसाईटवर प्रकाशित एका शोधनिबंधामध्ये याबाबत काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
हा शोधनिबंध रिझर्व बँकेच्या चलनविषयक धोरण विभागचे संचालक भूपाल सिंह, तसेच सांख्यिकी आणि माहिती विभागाचे संचालक इंद्रजीत राय यांनी तयार केला आहे.
Demonetization And Bank Deposit Growth या नावाखाली हा शोधनिबंध रिझर्व बँकेने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. यात म्हटलंय की, नोटाबंदीच्या काळात देशातल्या विविध बँकांमध्ये काही विशिष्ट खात्यांमध्ये Unusually (वापरात कमी असलेल्या बँक खात्यांमध्ये अचानक रोकड जमा होणे) रोकड जमा झाली. ही रक्कम 1.6 ते 1.7 लाख कोटी रुपये इतकी होती. याशिवाय, या काळात बँकिंग व्यवहारात जवळपास 2.8 ते 4.3 लाख कोटीची रक्कम नव्यानं वापरात आल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.
नोटाबंदीच्या म्हणजेच 11 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या काळात बँकिग व्यवहारात अतिरिक्त रोकड जमा होण्याच्या प्रमाणात 4 ते 4.7 टक्के वाढ झाल्याचं या शोधनिबंधात म्हटलं आहे. फेब्रुवारी 2017 च्या मध्यापर्यंतच्या आकड्यांचा समावेश केला, तर हा आकडा 3.3 ते 4.2 टक्के इतका आहे. तसेच मार्च 2017 अखेरच्या आकडेवारीनुसार, बँकेत जमा रक्कमेत 3 ते 3.8 टक्के वाढ झाली होती.
दुसरीकडे या काळात बँकांमधील एकूण जमा (ग्रॉस डिपॉझिट)मध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. नोटाबंदीच्या काळात बँकांच्या एकूण जमा रकमेमध्ये 14.5 टक्के वाढ झाली. तर एक वर्षापूर्वी म्हणजे 11 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2015 च्या काळात हा आकडा 10.3 टक्के होता.
म्हणजेच, नोटाबंदीच्या काळात बँकेत जमा रकमेत वाढ झाली असून, हा आलेख तसाच राहिला तर आगामी काळात बाजारापेठेवर याचे चांगले परिणाम दिसतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. नोटाबंदीच्या घोषणेवेळी एकूण 15.4 लाख कोटी रुपये किमतीच्या नोटा चलनात होत्या. चलनातील इतर नोटांच्या प्रमाणात या नोटांचे प्रमाणे 86.9 टक्के होते. नोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचाराविरोधात असल्याचा केंद्र सरकारचा दावा होता.
शोधनिबंधाच्या महत्त्वाच्या बाबी
- विविध बँकांमधील वापरात नसलेल्या खात्यांमध्ये 1.6 ते 1.7 लाख कोटी रुपये जमा
- अतिरिक्त रोकड जमा होण्याचे प्रमाण 4 ते 4.7 टक्के
- नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये 14.5 टक्के ग्रॉस डिपॉझिट
- गेल्या वर्षी (11 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2015 दरम्यान) बँकांच्या ग्रास डिपॉझिटचं प्रमाण 10.3 टक्के
- नोटाबंदीनंतर एकूण 15.4 लाख कोटी रुपये किमतीच्या नोटा चलनातून बाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement