एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘पीएमसी बँक घोटाळा’ : खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढून 40 हजारांवर
सुरुवातीला हजार रुपये नंतर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई केली होती. बँकेकडून लादण्यात आलेल्या या जाचक अटीनंतर संतप्त झालेल्या खातेदारांनी बँकेच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर बँकेकडून पैसे काढण्याची रक्कम वाढविण्यात आली आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) खातेदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'पीएमसी' बँकेच्या खातेदारांची पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता बँकेचे खातेदार 40 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. खातेदार पूर्वी खात्यातून 25000 रूपये काढू शकत होते.
'पीएमसी' बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर बँकेकडून हे निर्बंध लादण्यात आले होते. सुरुवातीला हजार रुपये नंतर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई केली होती. बँकेकडून लादण्यात आलेल्या या जाचक अटीनंतर संतप्त झालेल्या खातेदारांनी बँकेच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर बँकेकडून पैसे काढण्याची रक्कम वाढविण्यात आली आहे.
पीएमसी घोटाळाप्रकरणी बँकेच्या खातेदारांनी पैसे परत मिळण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. बँकेच्या खातेधारकांच्या हिताचे रक्षण केले जाईल असा विश्वास आरबीआयच्या गव्हर्नरांनी आपल्याला दिल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी यातील तीन आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि वारयाम सिंह यांना न्यायालयामोर हजर केले होते. न्यायालयाने या सर्व आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
देशातील १० सहकारी बँकांमध्ये समावेश असलेल्या पीएमसी बँकेत मार्च 2019 अखेर 11,600 कोटी रुपयांच्या ठेवींची नोंद आहे. बँकेच्या एकूण किरकोळ स्वरूपाच्या ठेवींमधील रक्कम ९१५ कोटी रुपये आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement