एक्स्प्लोर
Advertisement
मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याकडून महाराजांचा एकेरी उल्लेख; संभाजीराजे छत्रपती म्हणतात..
शिवसेना या पक्षावर टीका करताना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. त्यावर शिवभक्तांची माफी मागण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी शिवभक्तांची माफी मागावी, अशी आवाहन भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागण्यासंबंधी लिहले आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे नेते केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना या पक्षावर टीका करताना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. त्यावर शिवभक्तांची माफी मागण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. त्याबाबत त्यांनी लेटरहेडवर पत्र दिले आहे. तसेच ट्वीटकरुन त्याबद्दल माहिती दिली आहे.
काय म्हणाले खासदार संभाजीराजे छत्रपती ?
"केंद्रीय विधी व न्याय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद आपण आधी तमाम शिवभक्तांची माफी मागा. आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही. आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकरण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ अन बिनशर्त माफी मागावी".
सोनी टिव्हीनेही मागितली होती माफी सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने सोशल मीडियातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर सोनी वाहिनीने यासंदर्भात माफी मागितली आहे. काय होते प्रकरण गुजरातहून आलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. 'यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?' असा प्रश्न आमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारला. त्यानंतर दिलेल्या पर्यायांमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आला होता. संबंधित बातम्या - Kolhapur | शिवाजी महाराजांचा अपमान सहन न होणारा : खासदार संभाजी राजे |केंद्रीय विधी व न्याय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद आपण आधी तमाम शिवभक्तांची माफी मागा.
आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही. pic.twitter.com/A6481BOEuk — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement