एक्स्प्लोर

Ayodhya Railway Station : राम मंदिर उद्घाटना आधीच अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले! आता 'या' नावाने असणार स्टेशन

Ayodhya Railway Station Renamed : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी अयोध्येत जात तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याची सूचना केली होती.

Ayodhya Railway Station :  पुढील महिन्यात राम मंदिर (Ram Mandir) रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेसाठीची लगबग सुरू आहे. मंदिरातील बांधकामाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. तर, अयोध्येत जाण्यासाठी भाविकांसह राजकीय पक्षांचीही लगबग सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे आता अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात (Ayodhya Railway Station Renamed) आले आहे.  अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव आता 'अयोध्या धाम' (Ayodhya Railway Station Renamed As Ayodhya Dham) असणार आहे. रेल्वे प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचे आदेश जारी केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी अयोध्येत जात तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनचे नाव अयोध्या धाम ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहे. 

एक जानेवारीपासून भाविकांसाठी खुलं होणार स्थानक

अयोध्या धाम रेल्वे स्थानक सज्ज असून 1 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पीएम मोदी श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही करणार आहेत.

30 डिसेंबरला पंतप्रधान मोदी करणार स्टेशनचे उद्घाटन

त्रेतायुगाचे दर्शन घडविण्याचे ठिकाण म्हणून अयोध्या रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहे. हे स्टेशन पाहून तुम्हाला एखाद्या भव्य मंदिरासारखे वाटेल. येथून एक किलोमीटर अंतरावर राम मंदिर आहे. या स्थानकाची अंदाजे 50 हजार प्रवासी क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला त्याचे उद्घाटन करणार आहेत.

रेल्वे स्थानकावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

याशिवाय पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. कोटय़वधी रुपये खर्चून रेल्वे स्थानकाची इमारत मंदिर म्हणून विकसित करण्यात आली. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आहेत. लिफ्ट आणि एस्केलेटर बसवण्यात आले. तसेच अनेक मोठ्या सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
 
इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण

मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक

मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Embed widget