एक्स्प्लोर

बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी

निकालाच्या वेळी कोर्ट रुममध्ये न्यायाधीश, वकील, स्टाफ, बाबा राम रहिम, 2 पोलिस अधिकारी हे सात जणच उपस्थित होते. यामध्ये निकालाची सुनावणी सुरु असताना कोर्ट रुममध्ये उपस्थित लोकांचे मोबाईल फोन बंद केले होते.

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला. बाबा राम रहीमला 28 ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणार आहे. बाबाला 7 ते 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. निकालाच्या वेळी कोर्ट रुममध्ये न्यायाधीश, वकील, स्टाफ, बाबा राम रहिम, 2 पोलिस अधिकारी हे सात जणच उपस्थित होते. यावेळी निकालाची सुनावणी सुरु असताना कोर्ट रुममध्ये उपस्थित लोकांचे मोबाईल फोन बंद केले होते. तसंच पंचकुलाच्या रहिवासी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. बाबा राम रहीम रात्रभर सैन्याच्या कोठडीत दोषी ठरवल्यानंतर बाबा राम रहीमला आज रात्रभर सैन्याच्या कस्टडीत ठेवण्यात येईल. यानंतर उद्या त्यांना अंबाला जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. तिथे आधीच एक कोठडी तयार करण्यात आली असून तिथे त्याला ठेवलं जाईल. मग 28 ऑगस्टला अंबालावरुन पुन्हा पंचकुला सीबीआय कोर्टात शिक्षेच्या सुनावणीसाठी आणलं जाईल. तर अंबाला जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षेची सुनावणी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. बाबा राम रहीमच्या समर्थकांचा धुडगूस बाबा राम रहीमच्या अटकेनंतर अनुयायींनी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. बाबाच्या समर्थकांनी आज तक, टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या ओबी व्हॅनची तोडफोड केली. तसंच शिमला हायवेवर गाड्या फोडल्या तर पंजाबमधील दोन रेल्वे स्टेशनवर जाळपोळ केली. पंचकुलामध्ये पोलिसांनी डेरा सच्चा सौदाच्या अनुयायींवर अश्रू धुराचे गोळे फेकले. तर समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत एबीपी न्यूजच्या कॅमेरामनला दगड लागला. 800 गाड्यांच्या ताफ्यांसह कोर्टात पंचकुलामध्ये अनुयायींनी गर्दी केल्याने बाबा राम रहीमला सीबीआय कोर्टापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम सुमारे 800 गाड्यांच्या ताफ्यासह पंचकुला कोर्टात पोहोचला. राम रहीम मागच्या दरवाजाने कोर्टरुममध्ये दाखल झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण? एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती. डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं. जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी साध्वींचंही लैंगिक शोष झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही. ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. 2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले. जुलै 2016 :  खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते. जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली. 25 जुलै 2017 :  सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकडून लवकरच निकाल लावता येईल. 17 ऑगस्त 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली. 25 ऑगस्ट 2017 : बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम दोषी असल्याचा निकाल पंचकुला सीबीआय कोर्टाने दिला पंचकुलाला छावणीचं रुप निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुला कोर्ट परिसरात हायड्रोलिक क्रेन तैनात करण्यात आली आहे. शिवाय हेलिकॉप्टर आणि  ड्रोनच्या मदतीने देखरेख ठेवली जात आहे. तसंच कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने 100 निमलष्करी दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. हरियाणा सरकारने कलम 144 लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय 24 आणि 25 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. हरियाणाच्या सीमा सील केल्या आहेत. रेल्वे रद्द, इंटरनेट बंद पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानकडे जाणाऱ्या सुमारे 72 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर याशिवाय मोबाईल आणि इंटरनेट सेवाही 72 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. क्रिकेट स्टेडियमचं तात्पुरत्या जेलमध्ये रुपांतर बाबासंदर्भात येणारा निकाल पाहता पंजाब आणि हरियाणा सरकारला हायअलर्ट देण्यात आला आहे. 25 ऑगस्टला निर्णय येणार असल्याने चंडीगडच्या सेक्टर 16 मधील क्रिकेट स्टेडियम तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची शक्यता आहे. बाबा राम रहीमचं आवाहन यादरम्यान, गुरमीत राम रहीमने फेसबुक आणि ट्विटरद्वारे अनुयायींना शांततेचं आणि पंचकुला न जाण्याचं आवाहन केलं आहे. "मी कायम कायद्याचा आदर केला आहे. मला पाठदुखी आहे, तरीही मी कायद्याचं पालन करुन कोर्टात हजर राहणार. मला देवावर पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांनी शांतता राखा," असं बाबा राम रहीम म्हणाला. डेरा सच्चा सौदा आणि बाबा राम रहीमचे वाद 2001 – साध्वीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप 2002 – पत्रकार रामचंद्रच्या हत्येचा आरोप 2003 – डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांचं हत्याकांड 2007 – गुरु गोविंद सिंह यांच्या वस्त्रांवरुन शिखांसोबत वाद 2010 – डेराचे माजी व्यवस्थापक फकीर चंद बेपत्ता होण्याचं प्रकरण 2012 – डेरा सच्चा सौदाच्या 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप 23 व्या वर्षी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख 1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश देतात. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. पाच कोटी भक्त, अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत साम्राज्य डेरा सच्चा सौदा आश्रम सुमारे 68 वर्षांपासून सुरु आहे. डेरा सच्चा सौदाचं साम्राज्य देश परदेशात पसरलं आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यूएईपर्यंत डेराचे आश्रम आणि अनुयायी आहेत. जगभरात डेराचे जवळपास पाच कोटी अनुयायी आहेत. ज्यापैकी सुमारे 25 लाख अनुयायी एकट्या हरियाणात आहेत. बाबाला सिनेमाचा शौक बाबाला चित्रपटांचाही शौक आहे. एक, दोन नाही तर पाच सिनेमात त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. एमएसजीपासून  जट्टू इंजिनिअरपर्यंतच्या त्याच्या सगळ्या चित्रपटांना यश मिळालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget