एक्स्प्लोर
राम मंदिराच्या कामाचा मुहूर्त ठरला, असं असेल राममंदिर!
अयोध्येत राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरलाय. हे मंदिर कशा पद्धतीनं बांधलं जाणार याचीही उत्सुकता आहे. ट्रस्टच्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली. त्यानंतर आधीच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत.
अयोध्या : रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे...देशाच्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरलाय. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आलीय. हे मंदिर कशा पद्धतीनं बांधलं जाणार याचीही उत्सुकता आहे. कालच्या ट्रस्टच्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली. त्यानंतर आधीच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत.
असं असणार राममंदिर
- गर्भगृहापासून शिखराची उंची ही 138 फूटाऐवजी 161 फूट इतकी असणार आहे.
- आधीच्या मॉडेलमध्ये 2 च घुमटांची रचना होती, त्याऐवजी आता पाच घुमट करण्यात येणार आहेत.
- जमिनीत 60 मीटर खोलवर खोदकाम करुन पाया भक्कम करण्यात येणार आहे.
- लेआउट आधी आयताकार होता आता आर्किटेक्टच्या मके क्रुसीफार्म आकाराचा असणार आहे.
- हा आकार आधी 313×149 फूट था होता आता तो 344×235 फूट असेल.
- शिखरापर्यंतची उंची 138 फुटावरुन 161 फुटांपर्यंत झाली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टिनेही आकार वाढणार आहे.
- दगडांच्या बांधकामाचा आकार आधी 2,43,000 घनफुट होता, तो आता नवीन मॉडेलनुसार 3,75,000 घनफुट असेल
Ayodhya Ram Mandir | कसं असेल अयोध्येच्या नवीन राम मंदिराचं स्वरुप?
भूमिपूजन 5 ऑगस्टलाच का?- पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन 5 ऑगस्टला करण्यात येणार आहे. संपूर्ण भारताचे का दिवसाकडे लक्ष लागले आहे. मात्र त्यासाठी 5 ऑगस्ट हाच दिवस का निश्चित करण्यात आला. त्याला देखील कारण आहे. वास्तुशास्त्रानुसार हा शुभ मुहूर्त असल्याचे पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. तसेच या दिवसाला पौराणिक आणि आधुनिक भारताच्या इतिहासात देखील महत्व आहे. राम मंदिर निर्माण हा एक सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा विषय असल्याचे सोमण म्हणाले.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement