एक्स्प्लोर

Ram Mandir | ठरलं!, अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन

अयोध्येमध्ये राममंदिराचं (Ram Mandir) काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंदिराचं भूमिपूजन करणार आहेत.

अयोध्या: देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसते आहे.  उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहतील. अयोध्येत राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरलाय. रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे...देशाच्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आलीय. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांना त्यांंनी अनेकदा भेट दिली. पण अयोध्येचा विषय कोर्टाकडे होता. आता थेट संकल्पपूर्तीवेळीच मोदी अयोध्येत दिसतील. कोरोनाच्या काळात फार गर्दी होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येतेय. अगदी 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचं नियोजन आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. हे मंदिर कशा पद्धतीनं बांधलं जाणार याचीही उत्सुकता आहे. कालच्या ट्रस्टच्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली. असं असेल नवं राम मंदिर गर्भगृहापासून शिखराची उंची ही 138 फूटाऐवजी 161 फूट इतकी असणार आहे. आधीच्या मॉडेलमध्ये 2 च घुमटांची रचना होती, त्याऐवजी आता पाच घुमट करण्यात येणार आहेत. जमिनीत 60 मीटर खोलवर खोदकाम करुन पाया भक्कम करण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्यांमध्ये ट्रस्ट निर्माण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या राम मंदिर ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. मंदिरासाठी उत्तर प्रदेश सरकारचं 500 कोटींचं बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम मंदिराच्या 8 किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा, हॉटेल बांधण्यास परवानगी नसेल. पाच ऑगस्ट या तारखेचं आणखी एक महत्व म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी कलम 370 रद्द करण्याचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ आणखी एक महत्वाचा, प्रलंबित विषय याच दिवशी मोदी सरकार मार्गी लावतंय. सुप्रीम कोर्टानं मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राम मंदिराबाबत ऐतिहासिक निकाल दिला. सुप्रीम कोर्टानं मंदिर निर्मितीसाठी 3 महिन्यांत ट्रस्ट उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये या ट्रस्टची स्थापना झाली. नंतर रामनवमीचा एखादा मुहूर्त शोधून काम सुरु करण्याचा समितीचा मानस होता. मात्र कोरोना संकटामुळे हा संकल्प लांबणीवर पडला. या मंदिराचं काम साधारण तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण होऊ शकतं असा अंदाज आहे. अमित शाहांनी तर झारखंडच्या प्रचारात यापेक्षाही वेगवान म्हणजे सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची गर्जना केली होती. ते कधी पूर्ण होतं हे कळेलच. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकांआधी ते पूर्ण व्हावं हाच भाजपचा प्रयत्न असेल.

Ayodhya Ram Mandir | कसं असेल अयोध्येच्या नवीन राम मंदिराचं स्वरुप?

भूमिपूजन 5 ऑगस्टलाच का?-  पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन 5 ऑगस्टला करण्यात येणार आहे. संपूर्ण भारताचे का दिवसाकडे लक्ष लागले आहे. मात्र त्यासाठी 5 ऑगस्ट हाच दिवस का निश्चित करण्यात आला. त्याला देखील कारण आहे. वास्तुशास्त्रानुसार हा शुभ मुहूर्त असल्याचे पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. तसेच या दिवसाला पौराणिक आणि आधुनिक भारताच्या इतिहासात देखील महत्व आहे. राम मंदिर निर्माण हा एक सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा विषय असल्याचे सोमण म्हणाले.

Ayodhya Ram Mandir | रामजन्मभूमीचं सपाटीकरण करताना प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले

 

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Embed widget