एक्स्प्लोर
राज्यसभेसाठी भाजपच्या पहिल्या यादीने महाराष्ट्रातील सस्पेन्स वाढला!
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडकेर यांना यावेळी होम पीचवरुन म्हणजे महाराष्ट्रातून संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र तरीदेखील पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

नवी दिल्ली : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अरुण जेटलींसह, रविशंकर प्रसाद, जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांचीही नावं या पहिल्या यादीत आहेत. राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत कुणाची नावं?
- अरुण जेटली – उत्तर प्रदेश
- थावरचंद गहलोत – मध्य प्रदेश
- धर्मेंद्र प्रधान – मध्य प्रदेश
- मनसुख मांडाविया – गुजरात
- पुरुषोत्तम रुपाला – गुजरात
- जे. पी. नड्डा – हिमाचल प्रदेश
- रविशंकर प्रसाद - बिहार
- भूपेंद्र यादव – राजस्थान
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत























